मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सुनावले !
मुंबई : पारनेर अपडेट मिडिया
डोंबिवली (dombivali) बलात्कार (rape) प्रकरणावरुन राज्य सरकारला सुनावताना भाजपा नेत्या चित्रा वाघ (chitra wagh) यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (kishori pednekar) यांच्यावरही बोचरी टीका केली.
“महापौर ताई बोरिवलीला पोचलात. पण मग डोंबिवलीला का नाही गेल्या?” असं चित्रा वाघ म्हणाल्या होत्या. त्यावर आता किशोरी पेडणेकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
“त्यांना जरा प्रोटोकॉल समजावून सांगा. मी मुंबईची महापौर असल्यानं मुंबईत जिथं जिथं बरं वाईट घडतंय तिथं मी जातंय. मी डोंबिवलीतही जाईन पण त्या सांगतायत म्हणून मी नाही जाणार” असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या. “बाहेरून येवून अजेंडा चालवताय, चालावा. पण जास्त भाईगिरी नाही करायची. तुम्ही नाही शिकवायचं आम्हाला,कुठं जायचं ते” असा इशारा किशोरी पेडणेकर यांनी दिला.
“ताईगिरी व भाईगिरी तुम्हाला लखलाभ. आम्हाला शिकवायला जावू नका. बाडगे जोरात बांग देतात, तसं आहे यांचे. खोटे खोटे रडणं आम्हाला नाही जमत” अशी टीका किशोरी पेडणेकर यांनी केली.