parnerupdate.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • गुन्हे
  • शैक्षणिक
  • धार्मिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • गुन्हे
  • शैक्षणिक
  • धार्मिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
parnerupdate.com
No Result
View All Result

बनावट नोटा छापणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश !

लॉकडाऊनमुळे आलेल्या बेरोजगारीवर अशीही मात !

Parner Update Media by Parner Update Media
September 15, 2021
in गुन्हे
0
बनावट नोटा छापणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश !

नाशिक : पारनेर अपडेट मिडिया

कलर प्रिंटिंगचा व्यवसाय बंद असल्याने चक्क बनावट नोटांचा छापखाना सुरु केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.  नाशिक पोलिसांनी हा छापखाना उद्ध्वस्त केला असून या प्रकरणात एकूण सात जणांना अटक केलं आहे. नाशिकमधील सुरगाणा तालुक्यातील हा धक्कादायक प्रकार आहे. या छापखान्याचे धागेदोरे लासलगाव जवळील विंचूरपर्यंत असल्याचेही पोलिसांना समजले आहे. अटक केलेल्या आरोपींनी या छापखान्याच्या माध्यमातून आतापर्यंत लाखो बनावट नोटा छापल्या आहेत. (nashik police arrested seven accused for printing fake currency notes)

काम नसल्यामुळे सुरु केला नोटांचा छापखाना

मिळालेल्या माहितीनुसार कोरोना तसेच लॉकडाऊनमुळे नाशिकमधील काही तरुणांचा रोजगार गेला. कलर प्रिटिंगचा व्यवसायही ठप्प झाला होता. हाताला काम नसल्यामुळे या तरुणांनी चक्क नोटांचा छापखाना सुरु केला. या छापखान्यात आरोपी वेगवेगळ्या बनावट नोटा छापत होते. मागील तीन महिन्यांपासून बनावट नोटा छापण्याचे काम या तरुणांकडून सुरु होते.

बाजारात बनावट नोटांचा सुळसुळाट

विशेष म्हणजे नोटा छापण्याचे तसेच त्या बाजारात आणण्याचे काम अगदी नियोजनबद्ध पद्धतीने केले जायचे. मागील तीन महिन्यापासून दैनंदिन व्यवहारात बनावट नोटा आणल्या जात होत्या. मात्र हा प्रकार समोर यायला जास्त वेळ लागला नाही. आजूबाजूच्या व्यापाऱ्यांना आमच्याकडे बनावट नोटा येण्याचे प्रमाण वाढल्याचे समजले आणि आरोपींच्या कारनाम्याचा पर्दाफाश झाला.

नोटा छापण्याचं जाळं विंचूरपर्यंत पसरलं 

नाशिकच्या व्यापाऱ्यानी ही माहिती पोलिसांना दिली. पोलिसां नी या प्रकाराची गंभीर दखल घेत बनावट नोटांच्या छापखानाचा पर्दाफाश केला. सुरगाणा तालुक्यातीला हा धक्कादायक प्रकार आहे. मात्र हे जाळं लासलगाव जवळील विंचूरपर्यंत पसरलं असल्याचं सांगितलं जात आहे. तसा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

राजकीय क्षेत्रातही खळबळ

दरम्यान, या कारवाईत नाशिक पोलसांनी एकूण सात जणांना अटक केली आहे. कलर प्रिंटरचा व्यवसाय बंद असल्याने बनावट नोटा छापण्याचं धाडस अटक केलेल्या लोकांनी केलं आहे. या घटनेमुळे गुन्हेगारी क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. याशिवाय राजकीय व्यक्तीचा यामध्ये काही हस्तक्षेप आहे का ? याचादेखील तपास पोलिसांकडून केला जात आहे. त्यामुळे राजकीय क्षेत्रातदेखील खळबळ उडाली आहे.

Previous Post

उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यात शिरली अज्ञात कार !

Next Post

चंद्रकांत पाटील म्हणतात, दरेकरांच्या मनात अश्लिल अर्थ नव्हता !

Next Post
चंद्रकांत पाटील म्हणतात, दरेकरांच्या मनात अश्लिल अर्थ नव्हता !

चंद्रकांत पाटील म्हणतात, दरेकरांच्या मनात अश्लिल अर्थ नव्हता !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आक्रमक किरीट सोमय्यांचा पारनेर दौरा ठरला वांझोटा !

आक्रमक किरीट सोमय्यांचा पारनेर दौरा ठरला वांझोटा !

September 23, 2021
पवार व ठाकरे डाकू प्रवृत्तीचे ! महाराष्ट्रात हाहाःकार !

पवार व ठाकरे डाकू प्रवृत्तीचे ! महाराष्ट्रात हाहाःकार !

September 23, 2021
सोमय्यांचा आज दौरा : पारनेरमध्ये कडेकोट बंदोबस्त

सोमय्यांचा आज दौरा : पारनेरमध्ये कडेकोट बंदोबस्त

September 23, 2021
समाजातील सर्व घटकांच्या उत्थानासाठी प्रयत्नशिल : आमदार  लंके

मंत्र्यांच्या हस्ते प्रोटोकॉल प्रमाणे होणार त्या रस्त्यांचे भुमिपुजन : आ. लंके यांचे दाते, रोहोकले यांना प्रत्युत्तर

September 22, 2021
जरे हत्याकांड : “माने म्हणतात, हल्ला झाला त्यावेळी माझा फोन चालू होता !”

बाळ बोठेचा जामीन अर्ज फेटाळला !

September 22, 2021
शिवसेनेने उपोषणाचा इशारा देताच रस्त्यांची काम सुरू !

शिवसेनेने उपोषणाचा इशारा देताच रस्त्यांची काम सुरू !

September 22, 2021
Load More
  • Home
  • Sample Page
  • आ. लंके राष्ट्रवादीचा सामाजिक चेहरा-पद्मश्री पवार

© 2021 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • गुन्हे
  • शैक्षणिक
  • धार्मिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

© 2021 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!
WhatsApp Group
satta king gali