मागण्या मान्य न झाल्यास करणार आंदोलन : जितेश सरडे
पारनेर : पारनेर अपडेट मिडिया
गेल्या दिड वर्षांपासून देशातील महाविद्यालये बंद आहेत. देशातील संपूर्ण जनतेच्या लसीकरणाची जबाबदारी केंद्र सरकाने उचलली आहे. केंद्र सरकार राज्यांना लसींचा पुरवठा करत असून त्या पुरवठ्यानुसार लसीकरण सुरू आहे. राज्य शासनाकडून होणारी मागणी आणि केंद्र शासनाकडून होणारा पुरवठा यांमध्ये सातत्याने तफावत आहे.
केंद्र सरकारने विद्यार्थ्यांसाठी लसींचा स्वतंत्र पुरवठा करून विद्यार्थ्यांचे महाविद्यालय स्तरावर स्वतंत्र लसीकरण करावे अशी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, महाराष्ट्र प्रदेश च्या माध्यमातून मागणी करण्यात आली आहे
मोदीजी शिक्षणाचा खेळखंडोबा थांबवा , विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र लसीकरण राबवा..!
मोदीजी भाषणांचे वसीकरण थांबवा , विद्यार्थ्यांचे लसीकरण राबवा…!
मोदी सरकार आतातरी विचार करा थोडा, विद्यार्थ्यांच्या भविष्यात नका घालू खोडा…!
अश्या विविध घोषणांच्या माध्यमातून केंद्र सरकारचे लक्ष या मुद्यांकडे वेधले जाणार आहे.
विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहेत. विद्यार्थ्यांचे नुकसान म्हणजे एका पिढीचं नुकसान. त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी महाविद्यालये सुरू करण्याबाबत धोरणात्मक निर्णय होणे अपेक्षित आहे. केंद्र सरकारने त्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, महाराष्ट्र प्रदेश चे प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे यांच्या सूचनेनुसार, राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे.
मागणी पूर्ण झाली नाही तर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस च्या वतीने तिव्र आंदोलन करण्यात येइल असा इशारा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस माहिती तंत्रज्ञान प्रमुख जितेश सरडे यांनी दिला आहे .