पारनेर : पारनेर अपडेट मिडिया
जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाच्या रेसिडेन्शिअल महाविद्यालयाची विद्यार्थीनी, माजी आमदार नंदकुमार झावरे यांची नात, पारनेर पंचायत समितीचे माजी सभापती राहुल नंदकुमार झावरे यांची कन्या नक्षत्रा हिने बारावीच्या परीक्षेत शास्त्र विभागात ६००पैकी ५८२गुण मिळवून (९७%) गुण प्राप्त करीत आजोबा व वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेवले !
दहावीच्या परीक्षेत ९१% पेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या अक्षता हिने रेसिडेन्सिअल महाविद्यालयात प्रवेश घेते वेळी आजोबा संस्थेचे अध्यक्ष असताना इतर विद्यार्थ्यांप्रमाणे रांगेत उभे राहुन प्रवेश घेतल्याची आठवण वडील राहुल झावरे यांनी तिच्या यशानंतर करून दिली !
अतिशय प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत माजी आमदार नंदकुमार झावरे यांनी त्यांच्या काळात शास्त्र शाखेत मोठे यश संपादन केले होते. पुढे राजकारणात विधानसभेत तालुक्याचे प्रतिनिधित्व करताना झावरे यांनी तालुक्याचा आवाज बुलंद ठेवला. विशेषतः दुष्काळी भागाच्या विकासासाठी संघर्ष करताना त्या त्या भागातील आमदारांना संघतटीत करून स्वतःच्याच सत्ताधारी पक्षावर दबाव आणण्यास झावरे यांनी मागेपुढे पाहिले नाही.
विधानसभेतील ‘अशांत टापू’ चे नेते म्हणून त्यांची ओळख कायम राहिली. कुकडी कालव्याच्या पाण्यासंदर्भात पुणे जिल्हाकडून होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात झावरे यांनी नेहमीच आवाज उठवला. तालुक्याच्या हक्काच्या पाण्यासाठी त्यांनी राष्ट्रवादीचे दिग्गज नेते शरद पवार, अजित पवार यांच्या विरोधातही भूमिका घेण्यासाठी मागेपुढे पाहिले नाही.
दहा वर्षाच्या कारकिर्दीत कारकिर्दीनंतर त्यांचे चिरंजीव इंजिनीयर राहुल यांनीही पंचायत समितीच्या माध्यमातून सामान्य जनतेच्या हिताचे निर्णय घेण्याची भूमिका बजावली. आज जाहीर झालेल्या बारावीच्या निकालात यांची नात व राहुल यांची कन्या नक्षत्रा हिने मोठे यश संपादन करून आजोबा व वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवले आहे. तिचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
नक्षत्रास रेसिडेन्शिल महाविद्यालयाचे प्राचार्य अशोक दोडके,प्रा.सोळुकें प्रा.ढगे यांचे मार्गदर्शन लाभले.