जन्मभुमी युवा प्रतिष्ठाणचे महावृक्षारोपन अभियान : ४५ झाडांचे रोपन : संगोपनही होणार !
नांदूरपठार : पारनेर अपडेट मिडिया
पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून जलसंधारणाचे भरीव काम करणाऱ्या तालुक्यातील नांदूरपठार गावाने आता महावृक्षारोपन अभियान हाती घेतले असून वटपौर्णिमेचे औचित्य साधून वडाच्या झाडाच्या पुजनाबरोबरच गावामध्ये ४५ वडाच्या झाडांचे रोपन करण्यात येऊन त्याचे संगोपन करण्याचा निर्धार करण्यात आला. या झाडांचे संगोपन करणाऱ्या सुवाशिनीस पुढील वटपैर्णिमेस एक पैठणी, एक फळ व फुलझाड देऊन गौरविण्यात येणार आहे. ग्रामस्थांच्या सहभागातून जन्मभुमी युवा प्रतिष्ठाणने हे अभियान हाती घेतले आहे.
महावृक्षारोपनाच्या दुसऱ्या टप्प्यात जुलै महिन्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्यास एक झाड भेट देण्यात येऊन त्याच्या संगोपनाची जबाबदारीही शेतकऱ्यावर सोपविण्यात येणार आहे. शिवाय कोरोना महामारीमध्ये मृत पावलेल्या व्यक्तीच्या स्मरणार्थ रस्त्याच्या दुतर्फा नांदुर्की, पिंपळ, पिपर, भेंडी, पारीजात गुलमोहर, बकुळी या झाडांचे रोपन करण्यात येणार आहे. या उपक्रमाबरोबरच ‘पक्षी, प्राणी वृक्ष : गावशिवार आमुचा एका क्लिकवर’ ही पर्यावरणपूरक फोटोग्राफी स्पर्धाही आयोजित करण्यात येणार आहे.
या उपक्रमासाठी रामचंद्र देशमाने, अजय राजदेव, शशिकांत आग्रे, सतेश राजदेव, बाळू घोलप, नरसू घोलप, धनंजय वलवे, प्रकाश राजदेव यांनी पुढाकार घेतला. गावातील आग्रे वस्ती, पानसरदरा, चौधर वस्ती, शिवाजीवाडी या परिसरात शारदा घोलप, संगिता घोलप, प्रियंका घोलप, नंदा घोलप, भिमाबाई घोलप, सरिता राजदेव, अलका राजदेव, वंदना गाढवे, अनिता राजदेव, संपदा पानसरे, समिंद्रा राजदेव, नबाबाई गाढवे, धनश्री आग्रे, तुळासाबाई आग्रे, कमल आग्रे, पारूबाई आग्रे,प्रतिमा आग्रे, रोहिणी आग्रे, सुशिला आग्रे, सुनिता आग्रे, शोभा आग्रे, सुवर्णा आग्रे, मनिषा आग्रे, सोनाली आग्रे, ताराबाई वलवे, सुरेखा वलवे, हौसाबाई पानसरे, छाया पानसरे, फुलाबाई चौधरी, निर्मला चौधरी, जयश्री वलवे, अर्चना राजदेव, अनिता बिचारे, अनिता राजदेव, शोभा राजदेव, रखमाबाई राजदेव, भाग्यश्री राजदेव, गंगूबाई राजदेव, लिलाबाई राजदेव, मिराबाई राजदेव, आनंदाबाई राजदेव, शारदा राजदेव, स्वाती विश्वासराव, अलका राजदेव, पुनम मटाले या महिलांनी वडाच्या झाडाचे रोपन करून त्याचे संवर्धन करण्याचा निर्धार केला.