पारनेर : पारनेर अपडेट मिडिया
शेती पंपांच्या विजेची समस्या तालुक्यातील अनेक गावांमध्ये भेडसावत असताना तिखोलची अशीच दैना आमदार नीलेश लंके यांच्या पुढाकारातून हटली आहे. पुर्ण दाबाने, नियमित विज मिळू लागल्याने शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण आहे. शेतकऱ्यांनी आ. लंके यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करीत तिखोलच्या विकासाचा बॅकलॉग भरून काढण्याची मागणी केली. ही मागणीही आ.लंके यांनी मान्य करीत सर्व प्रश्न मार्गी लावण्याचे अश्वासन दिले.
नगर – कल्याण महाामार्गालगत, डोंगरांनी वेढलेल्या तिखोलमध्ये पाणी उपलब्ध असूनही विजेच्या समस्येमुळे शेतीसाठी पाण्याची मोठी समस्या निर्माण होत असे. त्यासंदर्भात वारंवार अर्ज विनंत्या करूनही काहीही मार्ग न निघाल्याने तिखोलचे शेतकरी तब्बल दहा वर्षांपासून न्यायाच्या प्रतिक्षेत होते. विधानसभा निवडणूकीत आ. नीलेश लंके यांचा विजय झाल्यानंतर तेथील नागरीकांनी आ. लंके यांच्याकडे या मागणीचा पाठपुरावा सुरू केला. कोरोना महामारीमुळे मागणीचा पाठपुरावा लांबणीवर पडूनही आ. लंके यांनी स्वतः पुढाकार घेत तिखोलच्या विजेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा केला.
पुर्ण क्षमतेने विजपुरवठा व्हावा यासाठी आ. लंके यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे वारंवार पाठपुरावा केला. आ.लंके यांच्या पाठपुराव्याची दखल घेत महावितरणने तिखोलसाठी पुर्ण क्षमतेने विजपुरवठा होईल अशी यंत्रणा उभी केली.
नीलेश लंके प्रतिष्ठाणच्या टाकळीढोकेश्वर गणाचे अध्यक्ष संदीप ठाणगे, सरपंच अनिल तांबडे, उपसरपंच चांद इनामदार, ग्रामपंचायत सदस्य भाउसाहेब ठाणगे, दत्तात्रेय ठाणगे, संदीप कावरे, तंटामुक्तीचे अध्यक्ष सुनिलशेठ ठाणगे, समता विद्यालयाच्या शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष उत्तम ठाणगे, सागर श्रीरंग ठाणगे, संकेत किसन ठाणगे, शिवाजी विष्णू ठाणगे, रावसाहेब नाना ठाणगे, पोपट रघूनाथ ठाणगे, ठकाजी देवराम ठाणगे, भानुदास शेटे, अबू दातीर, अप्पासाहेब अर्जुन ठाणगे, संजय ठाणगे (मेजर), दिनकर कुटे, संजय वाघ, संयज दोरगे, सबाजी ठाणगे, अनिल धोेंडीबा ठाणगे, सुर्यभान सहादू ठाणगे, भानुदास पंढरीनाथ ठाणगे, किरण तांबडे, ओमकार मंचरे, योगेश मेजर, बाळासाहेब ठाणगे (गुरूजी), रवि सिताराम ठाणगे, अमोल साळवे, सोमनाथ साळवे, संकेत अप्पा ठाणगे, दत्तात्रेय नाना ठाणगे, भाऊसाहेब नामदेव ठाणगे, संपत रावसाहेब ठाणगे, किरण सुंबरे, भगवंता मंचरे, बाळासाहेब नन्नवरे आदी ग्रामस्थांनी आ. लंके यांची भेट घेत दहा वर्षांपासून सुरू असलेली दैना दुर करण्याची मागणी केली होती. दरम्यान तिखोलसाठी गोरेगाव येथून स्वतंत्र फिडरच्या माध्यमातून विजपुरवठा सुरू करून देण्याची ग्वाही देखील आ. लंके यांनी दिली. महावितरणचे प्रशांत आडभाई, वैभव भुजबळ यांनी याप्रकरणी मोलाची मदत केली.
ग्रामपंचायत सदस्यांचे अभिनंदन !
नव्याने निर्वाचित ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी विजेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार नीलेश लंके यांच्याकडे पाठपुरावा करून काम मार्गी लावल्याबददल नागरीकांनी पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.