पारनेर : पारनेर अपडेट मिडिया
पंढरीच्या पांडूरंगाच्या दरवर्षी पार पडणाऱ्या आषाठी वारीमध्ये सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांची संख्या लाखांमध्ये असते. काळानुरूप वारकऱ्यांच्या सोयी, सुविधांमध्ये अमुलाग्र बदल होत असताना गेल्या विस वर्षापासून अनवाणी पायाने खांद्यावर विणा घेऊन पंढरीची वारी करणारे, पंढरपूरावरून परततानाही अनवाणीच खांद्यावर विणा घेउन येणाऱ्या बाबुराव महाराज विटेकर यांनी मात्र आपली वीस वर्षांपासूनच्या परंपरेमध्ये तसूभरही बदल केलेला नाही. आमदार नीलेश लंके यांच्या हस्ते विठठल तात्या भोगाडे वारकरी भुषण पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
हाडाचे किर्तनकार म्हणून ओळख असलेले बाबुराव महाराज विटेकर हे मोलमजुरी करून आपला चरितार्थ चालवितात. स्वतःचा चरितार्थ चालविताना ते कोणाकडूनही कशाचीही अपेक्षा ठेवत नाही. पंढरीच्या पांडूरंगाची सेवा करतानाही ते कशाचीही तडजोड करीत नाही. दरवर्षीच्या आषाढी वारीमध्ये ते खांद्यावर विणा घेऊन अनवाणी पायांनी सहभागी होता. पंढरीच्या पांंडूरंगाचे दर्शन घेतल्यानंतर ते अनवाणी पायांनीच विणा खांद्यावर घेऊन परततात. दरवर्षीच्या या सेवेनंतर त्यांना वर्षभराची उर्जा प्राप्त हाते. वर्षभर ते किर्तनाच्या माध्यमातून विठुरायाची सेवा करतात. किर्तनाच्या माध्यतून समाजाला उपदेश करतात.
वारकरी सांप्रदायासाठी आपले जिवन वाहून घेतलेल्या बाबुराव महाराजांच्या या कामाची दखल घेत भोयरे गांगर्डा ग्रामस्थांनी त्यांचा यथोचित सन्मान केला. जगभर किर्ती पावलेल्या आमदार नीलेश लंके यांच्या हस्ते त्यांना विठ्ठल तात्या भोगाडे वारकरी भुषण पुरस्कार देऊन त्यांचा हृद्य सन्मान करण्यात आला.
औचित्य होते हभप विठ्ठल (तात्या) किसनराव भोगाडे यांच्या प्रथम स्मृतीदिनाचे. विठ्ठल तात्यांनी सामाजिक जिवनात काम केल्यानंतर भोयरे गांगर्डाचे उपसरपंचपद तसेच ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिले. सामाजिक, राजकीय क्षेत्रात काम करतानाच धार्मीक क्षेत्रातही भोगाडे तात्या यांचा वावर होता. उत्तम हार्मोनियम वादक म्हणून ते परिचित होते. पंढरपूर, देहू, पिंपळनेर या पायी दिंडयांमध्ये त्यांचा हिरीरीने सहभाग असे. भोयरे गांगर्डामध्ये स्वतःच्या मालकीची जागा देत लोकवर्गणीतून त्यांनी पांंडूरंगाचे मंदीर उभारून धार्मीक कार्यात मोलाचे योेगदान दिले. त्यांच्या प्रथम स्मृतीदिनाचे औचित्य साधून पांडूरंग महाराज घुले यांच्यासारख्या किर्तनकारांना पहिला वारकरी भुषण पुरस्कार बहाल करण्यात येउन स्मृतीदिनाचे वेगळेपण जपण्यात आले. हभप विठ्ठल महाराज भोगाडे हे विद्यमान सरपंच अनिता भोगाडे यांचे सासरे तर माजी सरपंच भाऊसाहेब भोगाडे यांचे वडील होत.
यावेळी आमदार नीलेश लंके यांच्यासह दिपकअण्णा लंके, मा. सभापती सुदाम पवार, वाळवणेचे सरपंच सचिन पठारे, हंग्याचे सरपंच बाळासाहेब दळवी, वाघुंडेच्या सरपंच रेष्मा पवार, लोणीहवेलीच्या सरपंच जान्हवी दुधाडे, वाघुंडे बुद्रुकचे सरपंच संदीप वाघमारे,उपसरपंच गणेश रासकर, बाबुर्डीचे सरपंच प्रकाश गुंड, बाबासाहेब ठुबे, संजय गायकवाड, अनिल करपे, शरद कोठुळे, प्रविण आढाव, राजेश शेळके, मच्छिंद्र जरे, कारभारी पोटघन, सतिश भालेकर, सचिन साठे, संजय लाकूडझोडे, राजेंद्र साबळे, अरूण काटे, जयदीप साठे, सोपान दळवी, सुजित ढोरमले, संदीप मगर, शंकर साबळे, सुभाष ठुबे, बाळासाहेब गारकर, रमेश गवळी, सचिन गोटे, राजेंद्र साबळे, अरूण काटे, युवराज पाटील, संतोष गायकवाड आदी उपस्थित होते.