पारनेर : पारनेर अपडेट मिडिया
पारनेर बाजार समितीमध्ये शुक्रवारी झालेल्या कांदा लिलावामध्ये बुधवारच्या तुलनेत आणखी घटले ! बुधवारच्या तुलनेत आवकही घटली असताना भाव स्थिर राहतील अशी अपेक्षा होती, मात्र सर्वत्र आवक वाढल्याने भावावर परिणाम झाल्याचे सांगण्यात आले.
शुक्रवारी १० हजार ७३५ कांदा गोण्यांची आवक झाली. एक नंबर कांदयाला ३ हजार ५०० ते ३ हजार ७०० रूपयांचा दर मिळाला. दुसऱ्या क्रमांकाचा कांदा ३ हजार ते ३ हजार ४००, तिसया क्रमांकाचा कांदा २ हजार ते २ हजार ९००, तर चौथ्या क्रमांकावरील कांदा ५०० ते १ हजार ९०० रूपये प्रतिक्विंटल दराने विकला गेल्याचे बाजार समिती प्रशासनाकडून सांगण्यात आले.
अतिवृष्टीमुळे साठवून ठेवलेल्या कांद्याचे मोठे नुकसान झाले. वाचलेला कांदा शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणला. भाव वाढत असताना पुन्हा मंदी येऊ लागल्यामुळे इतके महिने साठवूनही चांगला भाव मिळत नसल्याने शेतकरी काहीसे हिरमुसले आहे. दरम्यान तालुक्यात कांदा पिकाची जोरदार लागवड सुरू असून भविष्यात प्रत्येक लिलावाच्या दिवशी पारनेर बाजार समितीमध्ये मोठया प्रमाणात कांदयाची आवक पहावयास मिळणार आहे.
राज्यातील प्रमुख बाजारपेठांत शुक्रवारी पुढीलप्रमाणे कांदा लिलाव झाले.
पुणे
आवक : ८,७२२ क्विंटल
कमाल दर : ८००
किमान दर : ३५००
सरासरी दर : २१५०
लासलगाव (विंचूर)
आवक : ५,३०० क्विंटल
कमाल दर : १०००
किमान दर : ३८००
सरासरी दर : ३३५०
पिंपळगाव बसवंत
आवक : १२५२० क्विंटल
कमाल दर : १०००
किमान दर : ४२१०
सरासरी दर : ३५००