पारनेर : पारनेर अपडेट मिडिया
आमदार नीलेश लंके यांचे साधे राहणीमान तसेच त्यांचे साधेच घर हा राज्यभर चर्चेचा विषय ठरलेला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही अलिकडेच आ. लंके यांच्या घरी भेट देत आ. लंके यांंच्या कुटूंबियांशी संवाद साधला होता. गुरूवारी पारनेर तालुक्याच्या दौऱ्यावर आलेल्या राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सकाळी आ. लंके यांच्या घरी पाहुणचार घेतला. त्यावेळी तनपुरे यांच्या मंत्रीपदाचा कुठेही थाट माट दिसून आला नाही. आ. लंके यांच्याप्रमाणेच त्यांनीही साधेपणाचे पाहुणचार घेतला. घरातील जमीनीवर बसून आ. लंके, इतर पदाधिकायांसमवेत त्यांनी जेवण केले. त्यांच्या या पाहुणचाराची मतदारसंघात चांगलीच चर्चा सुरू झाली आहे.
महावितरण तसेच आदीवासी विभागाच्या बैठकांसाठी मंत्री प्राजक्त तनपुरे हे पारनेरच्या दौऱ्यावर नगर येथून येणार होते. सकाळी ११ ची वेळ असल्याने आ. लंके यांना नगरहून पारनेरकडे जाताना घरीच पाहुणचार घेउन जाण्याचा आग्रह केला. तो मंत्री तनपुरे यांनी मोडला आहे. त्यांनी तात्काळ होकार देत हंगे येथील आ. लंके यांच्या निवासस्थानी वाहने वळाली.
आ. लंके यांचे घर पाहिल्यानंतर तनपुरे यांनीही आचंबा व्यक्त केला. मंत्री येणार म्हणून तेथे काही विशेष व्यवस्था नव्हती. नेहमीप्रमाणे घरच्या जेवणाची तयारी करण्यात आली होती. पाहुणे आल्यानंतर आ. लंके यांच्या कुटूंबियांनी त्यांचे स्वागत केले. जमीनीवर बसून सर्वांनी आ. लंके यांच्या घरच्या जेवणाचा अस्वाद घेतला.
आ. लंके यांच्या पाहुणचारानंतर माध्यमांशी बोलताना मंत्री तनपुरे म्हणाले, महावितरण, आदीवासी विभागाच्या बैठकांसाठी पारनेर दौऱ्यावर आलो होतो. आ. लंके यांनी घरी जेवणाचा आग्रह धरल्यानंतर तो मोडला नाही. आ. लंके हे एक मनमिळवू व्यक्तीमत्व आहे. कोणताही डामडौल नाही. आपल्याच घरी आल्यासारखं वाटलं. अतिशय प्रेमात आमचं स्वागत झालं. बाहेर कोणाच्या घरी गेलो अशी भावना मनात आली नाही. स्वतःच्याच घरात असल्यासारखे वाटले. अत्यंत साधे असलेले, जनतेच्या कामात सतत व्यस्त असलेले आमचे सहकारी आ. लंके यांचा आमच्या पक्षाला अभिमान आहे. त्यांनी त्यांच्या तब्बेतीची काळजी घेणे गरजेचे आहे. वेळेवर जेवणे घेतलं पाहिजे. असा सल्लाही मंत्री तनपुरे यांनी यावेळी बोलताना दिला.