श्रीक्षेत्र कोरठण : पारनेर अपडेट मिडिया
महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे कुलदैवत व श्रद्धास्थान असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील पिंपळगाव रोठा येथील स्वयंभू श्रीक्षेत्र कोरठण खंडोबा मंदिर सात ऑक्टोबर पासून शासन परवानगीने कोरोना नियमांचे पालन करीत भाविक भक्तांना दर्शना साठी खुले होणार आहे.
कोरोना काळामुळे यावर्षी ७महिने मंदिर दर्शनासाठी बंद होते . त्यामुळे देवाचे उत्सव , कुलधर्म , कुलाचार , जागरण गोंधळ विधी होऊ शकले नाहीत . नवरात्रीच्या घटस्थापनेच्या मुहूर्तावरच कुलदैवताचे साजशृंगारातील दर्शन लाभणार असल्याने उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. . ७ ऑक्टोबर पासून दररोज सकाळी ८ पासून सायं . ७वाजेपर्यंत मंदिर दर्शनासाठी खुले ठेवण्यात येईल . भाविक भक्तांनी कोरोना नियमांचे काटेकोर पणे पालन करून सहकार्य करावे . मास्कचा वापर , सॅनिटायझरचा वापर , सुरक्षित अंतर ठेवूनच मंदिर गाभाऱ्यात एका वेली फक्त ५ जणांनाचा प्रवेश राहील तळीभांडार गाभार्याचे बाहेर करावा . पादत्राणे स्वतःच्या वाहनातच ठेवावीत . गुप्त दान मंदिरातील दानपेटीतच अर्पण करावे रोख देणगीची ट्रस्ट पावती घ्यावी . सन २०२० –
आणि २०२१ मध्ये कोरोना लॉकडाऊन काळात श्री खंडोबा मंदिर दीड वर्षे बंद राहिल्याने उत्पन्नात लाखो रुपयांची घट झाली आहे . तरी मंदिर व परीसर विकास कामांसाठी सर्वानी यथाशक्ती देणगी देवस्थान ट्रस्टला देऊन सहकार्य करावे . बँक खाते न09620100005637 युको बँक चितळे रोड अहमदनगर . IF SC code-UCBA0000962 Shree Khandoba Devasthan Trust नावे देणगी जमा करता येईल पावसाळा सुरु असल्याने कोरठण देवस्थान परिसर निसर्गाने हिरवागार नटलेला असून पर्यटकांना आकर्षित करीत आहे. . नवरात्रीच्या पर्वकाळात कुलदैवताच्या दर्शनासाठी येणारे भाविक भक्त , श्रद्धाळू सर्वांचे देवस्थानतर्फे अध्यक्ष अँड . पांडुरंग गायकवाड, उपाध्यक्ष गंगाराम बेलकर, सरचिटणीस महेंद्र नरड , चिटणीस मनिषा जगदाळे , खजिनदार हनुमंत सुपेकर , विश्वस्त अश्विनी थोरात, मोहन घनदाट, किसन धुमाळ, चंद्रभान ठुबे, अमर गुंजाळ , साहेबा गुंजाळ, दिलीप घोडके , किसन मुंढे, देविदास क्षीरसागर , बन्सी ढोमे या विश्वस्त मंडळातर्फे हार्दिक स्वागत आहे. जय मल्हार ! विश्वस्त मंडळ श्री क्षेत्र खंडोबा देवस्थान ट्रस्ट . पिंपळगाव रोठा ता. पारनेर