पारनेर : पारनेर अपडेट मिडिया
करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने व पर्यावरण पूरक गणेश उत्सवाच्या अनुषंगाने अनंत चतुर्दशीला श्रीं च्या मूर्तीचे विसर्जनासाठी शहर परिसरामध्ये कृत्रिम विसर्जन केंद्र व निर्माल्य संकलन केंद्र स्थापन करण्यात आलेले आहे.
कृत्रिम विसर्जन व निर्माल्य संकलन केंद्र पुढीलप्रमाणे
१) सेनापती बापट विद्यालय मैदान
२) तलाठी कार्यालय, लोणी रोड, मोकळी जागा
३) संभाजी नगर, सार्वजनिक गणेश मंडळ, मोकळी जागा
४) बखळ गल्ली, मोकळी जागा
५) गणपती विसर्जन बारव, वरची वेस
सदर कृत्रिम विसर्जन केंद्राच्या ठिकाणी करोना विषयक प्रतिबंधात्मक उपाययोजना ज्यामध्ये मास्क व सॅनीटायझर चा वापर करणे, सामाजिक अंतराचे पालन करून शासनामार्फत सूचित केल्या नुसार विसर्जनासाठी श्रीं च्या मूर्ती सोबत फक्त २ भाविकांनी घरीच आरती करून श्रीं च्या मूर्तीचे विसर्जन कृत्रिम विसर्जन केंद्रामध्ये करून पूजेचे साहित्य व निर्माल्य नगरपंचायत कर्मचाऱ्यांकडे सुपूर्त करून नगरपंचातीस सहकार्य करण्याचे आवाहन पारनेर नगरपंचायत सर्व पदाधिकारी , कर्मचारी वृंद यांनी केले आहे.