मनसे शहराध्यक्ष वसिम राजे यांचा उपक्रम
पारनेर : पारनेर अपडेट मिडीया
दिवसेंदिवस लोप पावत चाललेली वाचन संस्कृती वाढीस लागावी, वाचकांना दर्जेदार साहित्य वाचण्यास मिळावे व त्यातून दिवाळीचा आनंद द्विगुणित व्हावा यासाठी आपण दिवाळीचे औचित्य साधत भेट म्हणून दिवाळी अंकांचे वाटप केले असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष वसिम राजे यांनी सांगितले.
दिवाळी निमित्त स्नेहीजनांना भेट वस्तू,मिठाईचे वाटप करण्यात येते.मनसेचे शहराध्यक्ष वसिम राजे यांनी दिवाळीनिमित्त दिवाळी अंकची भेट दिली.
आपल्या या उपक्रमाविषयी माहिती देताना वासिम राजे यांनी सांगितले की,मनसे नेहमीच मराठी भाषेच्या संवर्धनासाठी, वाढीसाठी प्रयत्नशिल असते.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे,माजी गृहमंत्री,मनसे नेते मराठी भाषा वापरासाठी आग्रही असतात.मनसेच्या मराठी भाषा संवर्धनाच्या भूमिकेला अनुसरून आपण स्नेहीजनांना दिवाळी अंकाची भेट दिली.
आपल्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतूक झाले.अनेकांनी दिवाळी पर्वात दर्जेदार साहित्य वाचण्यास मिळाल्याने दिवाळीचा आनंद द्विगुणित झाल्याचे सांगितले वासिम राजे म्हणाले.तरुण पिढी दिवसेंदिवस चांगल्या, दर्जेदार साहित्यापासून दुरावत चालली आहे.आपल्या या उपक्रमामुळे पारनेर शहरातील तरुण पुन्हा वाचनाकडे वळतील असा विश्वास राजे यांनी व्यक्त केला.