कवी संमेलनात नामवंत कविंचा सहभाग
पुरस्कार वितरण व कवी संमेलनास उपस्थित राहण्याचे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पारनेर शाखेचे अध्यक्ष दिनेश औटी यांचे आवाहन
पारनेर : पारनेर अपडेट मिडीया
महाराष्ट्र साहित्य परिषदेची पारनेर शाखा व मातोश्री प्रतिष्ठाणच्या वतीने देण्यात येणारा श्रीसंत तुकाराम महाराज साहित्य पुरस्कार प्रसिद्ध साहित्यिक संजय कळमकर यांना तर श्रीसंत तुकाराम महाराज कला पुरस्कार सिने अभिनेते मिलिंद शिंदे यांना जाहीर झाले आहेत.या पुरस्काराचे वितरण २८ नोव्हेंबर (शनिवार) रोजी सकाळी ११ वाजता आदर्शगाव योजनेचे अध्यक्ष, पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते होणार आहे.अकरा हजार रुपये रोख, स्मृतीचिन्ह, तुकाराम गाथा व श्रीसंत तुकाराम महाराज पागोटे असे या दोनही पुरस्कारांचे स्वरूप आहे.अशी माहिती महाराष्ट्र साहित्य परिषद पारनेर शाखा व मातोश्री प्रतिष्ठाणचे अध्यक्ष दिनेश औटी यांनी दिली.
पारनेर बाजार समिती रस्त्यावरील आनंद लॉनमध्ये होणाऱ्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील असतील.आमदार अरुण जगताप, आमदार नीलेश लंके, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कोषाध्यक्षा सुनिताराजे पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमात समर्थ शिक्षण संस्थेचे संस्थापक कैलास गाडीलकर व रामचंद्र अभियांत्रिकी महाविद्यालयाचे अध्यक्ष बापूसाहेब भूमकर यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे.
श्रीसंत तुकाराम महाराज साहित्य व कला पुरस्कारांचे हे पंधरावे वर्ष आहे.यापूर्वी प्रसिद्ध वात्रटिकाकार रामदास फुटाणे,तिफणकार,कवी विठ्ठल वाघ,पानीपतकार विश्वास पाटील, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष प्रा.फ.मुं.शिंदे, प्रसिद्ध हास्य कवी अशोक नायगावकर, कवी अरुण म्हात्रे, गीतकार प्रकाश होळकर,प्रा डॉ सुरेश शिंदे यांना यापूर्वी श्रीसंत तुकाराम महाराज साहित्य पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
लोककलावंत, सिनेअभिनेत्री मधू कांबीकर, वगनाट्य लेखक नाथामास्तर घोडेगावकर,वृत्तनिवेदीका स्वाती पाटणकर,लोकशाहीर संभाजी भगत या दिग्गज कलाकरांना मातोश्री प्रतिष्ठाणच्या वतीने श्रीसंत तुकाराम महाराज कला पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
पुरस्कार वितरण कार्यक्रमानंतर आयोजित करण्यात आलेल्या कवी संमेलनात प्रा. डॉ.सुरेश शिंदे (करमाळा),प्रकाश होळकर (लासलगाव), साहेबराव ठाणगे (पारनेर),सतिष सोळाकुरंकर (मुंबई),अरुण पवार (परळी), नारायण पुरी (तुळजापूर), संदिप जगताप (नाशिक),नीतिन देशमुख (अमरावती), विनायक पवार(जालना),भरत दौंडकर (निमगाव म्हाळुंगी), अशोक नायगावकर (मुंबई) आदी नामवंत कवी सहभागी होणार आहेत.पुरस्कार वितरण व कवी संमेलनाला उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.