पारनेर : पारनेर अपडेट मिडिया
चोवीस प्लॅटफॉर्मवर रिलीज होणारे भाऊसाहेब इरोळे लिखित आणि दिग्दर्शित ‘तू माझी पिपाणी’ हे गाणे तसेच त्याच्या पोस्टरचे रविवारी जातेगाव येथील काळभैरवनाथ देवस्थान येथे पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्या हस्ते लॉन्चिंग झाले.
तू माझी पिपाणी या संपूर्ण गाण्याचे चित्रीकरण पारनेर तालुक्यात झाले आहे. गाण्याचे गायक जसराज जोशी असून राजवर यांचे संगीत आहे. गाण्यात नटराज कोहिनूर ड्रीम्स अकॅडमी ऑफ फिल्म इन्स्टिट्यूट, शिरूरच्या विद्यार्थ्यांनी सहकलाकार म्हणून काम केले आहे तर मुख्य अभिनेत्री अश्विनी इरोळे आणि सिद्धांत मोरे हे मुख्य कलाकार आहेत. संगीत क्षेत्रातील नामांकित टी सिरीजने हे गाणे प्रदर्शित केले आहे.
यावेळी बोलताना आमदार निलेश लंके म्हणाले, गाणे पाहून मला आनंद वाटला. पारनेर तालुक्यात तयार झालेले हे गाणे इतके उत्कृष्ट चित्रीत करण्यात आले आहे की त्यातून कोकणाचा निसर्ग भासत आहेत. पारनेरच्या भूमीत जन्मलेल्या दिग्दर्शकाने तालुक्यातील लोकेशन निवडून अश्विनी इरोळे आणि सिद्धांत मोरे या नामांकित कलाकारांबरोबर काही नवीन कलाकारांना घेऊन गाण्याची मांडणी अतिशय सुरेख केली आहे. टी सीरिज सारख्या सर्वात मोठ्या कंपनी मार्फत रिलीज केले ही देखील अभिमानाची बाब आहे. गायन, संगीत ,नृत्य, दिग्दर्शन सर्वच अप्रतिम असल्यामुळे हे गाणे या वर्षीचे सर्वात हिट गाणे असणार आहे असे सांगत त्यांनी सर्व टीमला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमास भैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अर्जुन बढे, उपाध्यक्ष विजय जऱ्हाड, सचिव प्रभू गायकवाड, पत्रकार विशाल फटागंडे, संजय लाकूडतोडे , भूमिअभिलेख आभियंता विनायक ठाकरे ,रघुनाथ खोडदे, कारभारी पोटघन मेजर मान्यवर उपस्थित होते.