parnerupdate.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • गुन्हे
  • शैक्षणिक
  • धार्मिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • गुन्हे
  • शैक्षणिक
  • धार्मिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
parnerupdate.com
No Result
View All Result

‘तू माझी पिपाणी’ गाणे व  पोस्टरचे आ.  लंके यांच्या हस्ते लॉन्चीग

Parner Update Media by Parner Update Media
November 10, 2020
in सांस्कृतिक
0
‘तू माझी पिपाणी’ गाणे व  पोस्टरचे आ.  लंके यांच्या हस्ते लॉन्चीग
पारनेर : पारनेर अपडेट मिडिया
     चोवीस प्लॅटफॉर्मवर रिलीज होणारे भाऊसाहेब इरोळे लिखित आणि दिग्दर्शित ‘तू माझी पिपाणी’ हे गाणे तसेच त्याच्या पोस्टरचे रविवारी जातेगाव येथील काळभैरवनाथ देवस्थान येथे पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्या हस्ते  लॉन्चिंग झाले.
     तू माझी पिपाणी या संपूर्ण  गाण्याचे  चित्रीकरण पारनेर तालुक्यात झाले आहे.  गाण्याचे गायक जसराज जोशी असून  राजवर यांचे संगीत आहे.   गाण्यात नटराज  कोहिनूर ड्रीम्स अकॅडमी ऑफ फिल्म इन्स्टिट्यूट, शिरूरच्या विद्यार्थ्यांनी सहकलाकार म्हणून काम केले  आहे तर मुख्य अभिनेत्री अश्विनी इरोळे आणि सिद्धांत मोरे हे मुख्य कलाकार आहेत. संगीत क्षेत्रातील नामांकित टी सिरीजने हे गाणे प्रदर्शित केले आहे.
     यावेळी बोलताना आमदार निलेश लंके म्हणाले, गाणे पाहून मला आनंद वाटला.   पारनेर तालुक्यात तयार झालेले हे गाणे इतके उत्कृष्ट चित्रीत करण्यात आले आहे की त्यातून कोकणाचा निसर्ग भासत आहेत. पारनेरच्या भूमीत जन्मलेल्या दिग्दर्शकाने  तालुक्यातील  लोकेशन निवडून अश्विनी इरोळे आणि सिद्धांत मोरे या नामांकित कलाकारांबरोबर काही नवीन कलाकारांना घेऊन  गाण्याची मांडणी अतिशय सुरेख केली आहे.  टी सीरिज सारख्या  सर्वात मोठ्या  कंपनी मार्फत रिलीज केले ही देखील अभिमानाची बाब आहे.  गायन, संगीत ,नृत्य, दिग्दर्शन सर्वच अप्रतिम असल्यामुळे हे गाणे या वर्षीचे सर्वात हिट गाणे असणार आहे असे सांगत  त्यांनी सर्व टीमला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
     कार्यक्रमास भैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अर्जुन बढे, उपाध्यक्ष विजय जऱ्हाड, सचिव प्रभू गायकवाड, पत्रकार विशाल फटागंडे, संजय लाकूडतोडे , भूमिअभिलेख आभियंता विनायक ठाकरे ,रघुनाथ खोडदे, कारभारी पोटघन मेजर   मान्यवर उपस्थित होते.
Previous Post

भुमिअभिलेखची मुजोरी : तहसिलदारांनाच दारात ताटकळत ठेवले !

Next Post

तिघे व्याही, औटी, पठारे, सय्यद, शेख, देशमुख आदींचा आरक्षणामुळे हिरमोड!

Next Post
तिघे व्याही, औटी, पठारे, सय्यद, शेख, देशमुख आदींचा आरक्षणामुळे हिरमोड!

तिघे व्याही, औटी, पठारे, सय्यद, शेख, देशमुख आदींचा आरक्षणामुळे हिरमोड!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वनकुट्यात जिल्हयातील सर्वात मोठया कुस्ती मैदानाचे आयोजन

वनकुट्यात जिल्हयातील सर्वात मोठया कुस्ती मैदानाचे आयोजन

April 12, 2022
लमाण तांडयावर साजरी केली पारनेरच्या या नेत्याने दिवाळी !

यात्रोत्सव : या गावच्या सरपंचांकडून गावातील वंचितांना कपडयांची भेट !

April 10, 2022
कुठे सुपारी दिली ! कुठे फायरही झाला ! आ. लंकेंनी प्रथमच कथन केला राजकीय संघर्ष

प्रसंगी संपूर्ण आमदार निधी एकाच उपक्रमावर खर्च करू !

April 10, 2022
पारंपारीक लेझिम, झिम्मा आणि फुगडया ! निघोजमध्ये नववर्षाचे स्वागत !

पारंपारीक लेझिम, झिम्मा आणि फुगडया ! निघोजमध्ये नववर्षाचे स्वागत !

April 2, 2022
लेकीने जपली बापाची परंपरा ! ३१ तारखेलाच ‘कान्हूरपठार’ चा ताळेबंद जाहीर

लेकीने जपली बापाची परंपरा ! ३१ तारखेलाच ‘कान्हूरपठार’ चा ताळेबंद जाहीर

March 31, 2022
पारनेर शहरासाठी महिन्यात दहा कोटींचा निधी मिळाला का ?

पारनेर शहरासाठी महिन्यात दहा कोटींचा निधी मिळाला का ?

March 20, 2022
Load More
  • Home
  • Sample Page
  • आ. लंके राष्ट्रवादीचा सामाजिक चेहरा-पद्मश्री पवार

© 2022 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • गुन्हे
  • शैक्षणिक
  • धार्मिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

© 2022 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!
WhatsApp Group
satta king gali