पोपटराव पवार यांचा विश्वास : केअर अॅण्ड क्युअर डेंटल क्लिनिकचे उदघाटन
नगर : पारनेर अपडेट मिडिया
आपल्याकडे अनेक स्कॉलर विद्यार्थी आहेत, त्यांचा समाजासाठी म्हणावा तसा उपयोग होताना दिसत नाही. समाजासाठी वाहून घेतलेल्या कुटूंबात जन्मलेल्या स्कॉलर डॉ. आयेशाच्या विद्वत्तेचा रूग्णांना निश्चित फायदा होईल असा विश्वास पद्मश्री पोपटराव पवार यांनी व्यक्त केला.
डॉ. आयेशा फिरोज राजे (शेख) यांच्या नगर शहरातील रामचंद्र खुंंट येथील केअर अॅण्ड क्युअर डेंटल क्लिनीकचे उदघाटन पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्यांनी डॉ. आयेशा यांच्या विद्वत्तेचे, त्यांचे वडील डॉ. सईद शेख यांच्या कुटूंबियांचे कौतुक केले. यावेळी आमदार निलेश लंके, आमदार संग्राम जगताप, डॉ. रफीक सय्यद, निखिल वारे, बाळासाहेब बोरोटे, सचिन जाधव, शौकत तांबोळी, अब्दुल सलाम, अभय आगरकर, उबेद शेख, हसन राजे, सिताराम खिलारी, डॉ. कुदरत शेख, हाजी नजीर, डॉ. जहीद शेख, डॉ. हिवाळे, डॉ. रविराज, डॉ. निमसे, डॉ. धुत, डॉ. मिसाळ, लेबर कमीशनर मोहसिन शेख, डॉ. सादीक राजे, डॉ. कावरे, बबन शेख, अबिद पठाण, सखाराम औटी, शैलेंद्र औटी, राजू शेख, युवराज दिवटे, धोंडीभाऊ पुजारी, वसीम राजे, दिलीप दाते, गोपी गाडगे, भैय्या परदेशी, बाळासाहेब पुजारी, बबलू राजे, सद्दाम शेख, चंदू गंधाडे, संतोष गाढवे, गणेश मगर,उमेश क्षिरसागर, राजू शेख सुपे, शरद पवार, नबी देशमुख, जालींदर गाडे, नसिर पठाण आदी उपस्थित होते.
पवार म्हणाले, डॉ. सईद शेख यांनी गळक्या पत्र्याच्या खोलीत सुरू केलेली ओपीडी ते सुसज्ज हॉस्पिटलपर्यंतचा प्रवास हा जिवनात प्रामाणिकपणे केलेल्या कामाचे फळ आहे. त्यांची मुलेही प्रामाणिकपणे सेवा करीत आहेत. हसन राजे यांचेही सामाजिक काम खूप मोठे आहे.पर्यावरणापासून इतर गोष्टींकडे त्यांचे नेहमीच लक्ष असते. राजे व शेख हे दोन्ही परीवार आनंदी परीवार आहेत. जिवनामध्ये आनंद मिळवायचा काशामध्ये ? पैशामध्ये की रूग्णाला आनंदाने घरी जाताना पाहण्यात ? असा सवाल करून पवार म्हणाले, डॉ. शेख यांनी आनंदाचा राजमार्ग बालपणीच शोधला. वडीलांनी दिलेले शिक्षण, त्यांचे कष्ट, पती, पत्नी तसेच मुलांनी घेतलेले कष्ट हेच त्यांच्या आजच्या यशाचे रहस्य आहे.
महाविद्यालयीन मीत्र असलेल्या डॉ. शेख यांचा हा छोटेखानी परंतू आनंदाचा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमात अनेक पेस, बाउंसर, गुगली पहावयास मिळाल्या. जोरदार बॅटींग झाली. छोटा कार्यक्रम व्हरायटी मात्र भरपूर होती असे ते म्हणाले.
तर डॉ. आयेशा युपीएसीच्या यादीत
डॉ. आयेशा टॉपर आहे. तीने युपीएससीची तयारी करून परीक्षा दिली असती तर अलिकडेच जाहिर झालेल्या निकालात यशस्वी उमेदवारांमध्ये तिचा नक्कीच समावेश असता असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.
नेकी और इमानदारी !
अल्लाहने बताये हुये रास्तेसे नेकी और इमानदारीसे चलेंगे तो अल्लाह जो देता है वो आज हम सब देख रहे है. असे सांगत पवार यांनी डॉ. शेख यांच्या कुटूंबियांच्या प्रामाणिक सेवेचे कौतुक केले.
महाविद्यालयीन आठवणींना उजाळा
डॉ. शेख यांच्याशी असलेल्या मैत्रीच्या अनेक आठवणी पवार यांनी यावेळी सांगितल्या. वर्ग बुडवून मैदानावर क्रिकेट खेळताना टाळया वाजविण्यासाठी डॉ. शेख हे आवर्जून उपस्थित असायचे. वाडीया पार्क, सारडा कॉलेज, नगर कॉलेज, न्यू आर्टस कॉलेज मध्ये आपला मोठा कालखंड गेला. आमची क्रिकेटबरोबरच कौटूंबिक मैत्रीही होती. आजही डॉ. शेख यांच्या पत्नी जनरल प्रॅक्टीसनर असल्या तरी त्या आमच्या कुटूंबाच्या गायनीक सल्लागार आहेत. त्यांच्या घरी आजही जाणे येणे असल्याचे पवार यांनी आवर्जून सांगितले.
दात तुटला तरीही मॅच जिंकली !
जुन्या आठवणींना उजाळा देताना पवार यांनी क्रिकेट खेळताना तुटलेल्या दाताचा किस्सा आवर्जून सांगितला. पहिल्या दोन चेंडूंवर चौकार ठोकल्यानंतर तिसरा चेंडू बाउंसर आला. तो दातावर लागून दात तुटला. त्यानंतर रूग्णालयात जाऊन १४ टाके घातले व मैदानात पुन्हा उतरलो. बॅटींग बरोबरच बॉलींग करून ही मॅच आम्हीच जिंकल्याचे ते म्हणाले. जिवनात आपण ज्या क्षेत्रात उतरू तेथे आपण प्रामाणिकपणे काम केले तर आनंद निश्चित मिळतो. सर्वांच्या पाठबळामुळे तो आनंद मी देखील घेत असल्याचे पवार म्हणाले.