पारनेर : पारनेर अपडेट मिडिया
टाकळी ढोकेश्वर येथील नवोदय विद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये कोरोनाचा सामूहिक संसर्ग झाल्यानंतर तालुक्यासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. त्यापाठोपाठ आता पारनेर पोलीस स्टेशनमध्ये ही कोरोना बाधित कर्मचाऱ्यांची मोठी संख्या पुढे आल्याने प्रशासनापुढील चिंता वाढली आहे. श्रीगोंदे साखर कारखान्याची निवडणूक, पारनेर नगरपंचायत निवडणूक तसेच वेगवेगळ्या बंदोबस्तामुळे पोलीस कर्मचारी व्यस्त आहेत.विविध ठिकाणी वेगवेगळ्या नागरिकांशी संपर्क आल्यानंतर या कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असावी अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
सहा. पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ. दि.१५ जनेवारी पासून कोरोना बाधित असून पो.हे.काॅ.जे.के.लोंढे. दि.१५ जानेवारी पासून बाधित आहेत. दोघेही डॉक्टरांच्या सल्ल्याने घरी उपचार घेत आहेत.
दि.११ जानेवारी रोजी कोरोना पाॅझिटीव्ह आल्यानंतर सहा.पोलिस.निरिक्षकआर.डी.काळे यांच्यावर घरी उपचार सुरू आहेत. पो.काॅ. एस.एस.तोरडमल दि.१२ जानेवारी रोजी कोरोना पाॅझिटीव्ह आले. डॉक्टरांच्या सल्ल्याने ते घरी उपचार घेत आहेत. तोरडमल यांच्या पत्नीही दि.१४ जानेवारी रोजी कोरोना पाॅझिटीव्ह आल्या. त्यांच्यावरही घरीच उपचार सुरू आहेत.
दि.१३ जानेवारी रोजी कोरोना पाॅझिटीव्ह अहवाल अल्यानतर पो.ना.डी.बी.थोरात हे घरी उपचार घेत आहेत. दि.१३ जानेवारी रोजी कोरोना पाॅझिटीव्ह अहवालानंतर पो.काॅ.डी.जी.चौगुले डॉक्टरांच्या सल्ल्याने घरी उपचार घेत आहेत. पो.काॅ.एस.आर.लोळगे दि.१४ जानेवारी रोजी कोरोना पाॅझिटीव्ह आल्यानंतर त्यांच्यावर घरीच उपचार सुरू आहेत. दरम्यान, या बाधित कर्मचाऱ्यां व्यतिरिक्त इतर कर्मचाऱ्यांच्याही कोरोना चाचण्या करण्यात आल्या असून त्यांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.