पारनेर : पारनेर अपडेट मिडिया
तालुक्यातील बडे देवस्थान म्हणून ओळख असलेल्या जातेगांव येथील श्री भैरवनाथ देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्तांच्या निवडी धर्मदाय आयुक्तांनी घोषीत केल्या असून त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा वरचष्मा असल्याचे दिसून येते. सत्ताधारी शिवसेनेनेही विश्वस्त मंंडळामध्ये चंचूप्रवेश केला आहे.
राज्यातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या जातेगांवच्या श्री. भैरवनाथ देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाची मुदत काही महिन्यांपूर्वीच संपली होती. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे नव्या विश्वस्तांच्या निवडीचा कार्यक्रम लांबणीवर पडला होता. कोरोनाच्या रूग्णसंख्येत घट झाल्यानंतर बंधने शिथील करण्यात आली व त्यानंतर विश्वस्त मंडळ निवडीसाठी धर्मदाय आयुक्तांकडून आवेदने मागविण्यात आली होती. पंचक्रोशीतील १०३ भाविकांनी विश्वस्त म्हणून निवड व्हावी यासाठी अवेदनपत्रे सादर केली होती.
धर्मदाय आयुक्तांनी विविध निकषांच्या अधारे पुढील भाविकांची विश्वस्त (ट्रस्टी) पुढील पाच वर्षांसाठी नियुक्ती करण्यात येत असल्याचे बुधवारी घोषीत केले.
विजयकुमार बन्सी जगताप (पळवे खुर्द), सविता विजय ढोरमले (जातेगांव), दत्तात्रेय शिवाजी ढोरमले (जातेगांव), शिवराम गेणबा पोटघन (जातेगांव), सुरेश बबन बोहृडे (नारायणगव्हाण), जयसिंग बबन धोत्रे (वाडेेगव्हाण), रूपाली सचिन पोटघन (जातेगांव), गणेश बाजिराव वाखारे (जातेगांव), सचिन चंद्रकांत ढोरमले (जातेगांव), निर्मला बाळू कळमकर (पळवे बुद्रुक), सोनाली सुजित ढोरमले (जातेगांव), शिवाजीनाना भगत राजे (पानोली), सुनिता विठ्ठल पोटघन (जातेगांव), गणेश भाऊसाहेब शेळके (वाडेगव्हाण), विशाल हरिभाऊ फटांगडे (जातेगांव)
शिवसेनेच्या पंचायत समितीचे सभापती गणेश शेळके, नारायणगव्हाणचे माजी सरपंच सुरेश बोहृडे तसेच पक्षाचे पदाधिकारी जयसिंग धोत्रे या बड्या पदाधिकऱ्यांची विश्वस्त मंडळात वर्णी लागली आहे.