parnerupdate.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • गुन्हे
  • शैक्षणिक
  • धार्मिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • गुन्हे
  • शैक्षणिक
  • धार्मिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
parnerupdate.com
No Result
View All Result

जवळ्यात दारूबंदी करा म्हणणारेच झिंगले !

Parner Update Media by Parner Update Media
November 1, 2021
in सामाजिक
0
तिच्या हातावर लिहिलेला  मोबाईल नंबर कोणाचा ?

दारूबंदी समितीची स्थापना , धाब्यांवर छापे

जवळे : पारनेर अपडेट मिडिया

जवळे ता पारनेर येथे नुकत्याच घडलेल्या खुन प्रकरणामुळे ग्रामस्थांनी तातडीने दारूबंदी समितीची स्थापना केली . या
समितीने लगेचच कामकाज चालू केले व रविवारी रात्री गावातील दारूविक्री होत असणाऱ्या धाब्यांवर छापे टाकले . त्यावेळी त्यांना तिथे गावातील प्रतिष्ठीत दारू पिताना आढळून आले . विशेष म्हणजे तेथे दारू पीत झिंगलेलेच जवळ्यात दारूबंदी करा असा आग्रह करत होते !

समितीच्या सदस्यांना पाहताच त्यांनी आपले तोंड दडवत पळ काढला तर काहींनी पुन्हा नाही दिसणार असे म्हणत दिलगीरी व्यक्त केली . समितीच्या सदस्यांनी यावेळी या
मद्यपिंना समज देण्याची भुमिका घेतली . पुन्हा दिसले तर पोलिसांना बोलावून थेट गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे सांगितले .

यावेळी पुरावे म्हणून सर्व घटनेचे मोबाईलद्वारे चित्रीकरण करण्यात आलेले आहे . प्रसंगी ते आम्ही ग्रामसभेत सादर करू अशीही भुमिका समितीने घेतली आहे . गेल्या महीनाभरापूर्वी गावातील याच मद्यधुंद पदाधिकाऱ्यांनी पोलिस निरीक्षक घनश्याम बळप यांना गावात दारूबंदी करण्यासाठी प्रत्यक्ष भेटुन पत्र दिले होते . आज मात्र तेच पदाधिकारी गावातील याच धाब्यांवर मद्य प्राशन करताना आढळले !

जवळे गावात असणारे अधिकृत दारूचे दुकान गेल्या पंचविस वर्षापुर्वी बंद केले होते . तेव्हापासुन पुढे बरेच दिवस गावात दारूबंदी लागू होती . महीलांनी चार वर्षांपूर्वी गावात दारूबंदी साठी मोठे आंदोलन केले होते . त्यामुळे दारूबंदी साठी जवळे गाव नेहमी पुढाकार घेताना दिसते .
परंतु अलिकडच्या काळातील गावकारभारी मात्र यास फारसे अनुकुल नाहीत हे कालच्या घटनेवरून अधोरेखीत होते . कारण माजी सरपंच , आजी माजी चेअरमन , उपसरपंच , सरपंच पती , तंटामुक्ती , आजी माजी पंचायत सदस्य व सदस्स पती राजकीय पक्षाचे पदाधिकारी , प्रतिष्ठित बागायतदार काल या वेळी दारू बंदी समितीला आढळून आले . यावरून गावात समाजासमोर दिवसा दारूबंदीची मागणी करणारे यांचा मात्र दारू साठी रात्रीस खेळ चाले हे दिसून आले . जवळे दारूबंदी समितीचे अध्यक्ष रायचंद आढाव यांच्या अध्यक्षतेखाली धाब्यांवर छापे टाकण्यात आले .

Previous Post

रूईछत्रपती सेवा संस्थेत राष्ट्रवादीचे पॅनल विजयी

Next Post

कांद्याचे सोमवारचे (१ नोव्हेंबर) राज्यातील दर

Next Post
रविवारी कांदा दरात ४ रूपयांची घट

कांद्याचे सोमवारचे (१ नोव्हेंबर) राज्यातील दर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

त्या सुसाईड नोटमध्ये मंत्री गडाखांचे नाव : भाजपाने केली चौकशीची मागणी

त्या सुसाईड नोटमध्ये मंत्री गडाखांचे नाव : भाजपाने केली चौकशीची मागणी

November 1, 2021
राज्यात कोरोनाचे थैमान; २४ तासांत २०४८९ नवे रुग्ण ३१२ दगावले

जिल्ह्यातील सोमवारची (१ नोव्हेंबर) रुग्णसंख्या :पारनेर दुसऱ्यावरून पाचव्या क्रमांकावर

November 1, 2021
टोमॅटोचे सोमवारचे (१ नोव्हेंबर) राज्यातील बाजारभा

टोमॅटोचे सोमवारचे (१ नोव्हेंबर) राज्यातील बाजारभा

November 1, 2021
शेतकऱ्यांना दिलासा : डाळिंबाच्या नुकसानीपोटी २.२० कोटी 

डाळिंबाचे सोमवारचे (१ नोव्हेंबर) राज्यातील बाजारभाव

November 1, 2021
रविवारी कांदा दरात ४ रूपयांची घट

कांद्याचे सोमवारचे (१ नोव्हेंबर) राज्यातील दर

November 1, 2021
तिच्या हातावर लिहिलेला  मोबाईल नंबर कोणाचा ?

जवळ्यात दारूबंदी करा म्हणणारेच झिंगले !

November 1, 2021
Load More
  • Home
  • Sample Page
  • आ. लंके राष्ट्रवादीचा सामाजिक चेहरा-पद्मश्री पवार

© 2021 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • गुन्हे
  • शैक्षणिक
  • धार्मिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

© 2021 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!
WhatsApp Group
satta king gali