दिपावलीचे औचित्य साधून यंदाची दिवाळी ध्वज दिवाळी म्हणून साजरी करण्याचा संकल्प औरंगाबाद येथील शिवसैनिकांनी केला असून त्यानिमित्ताने शहरातील तब्बल ५० हजार घरांवर भगवे ध्वज उभारण्यात येणार आहेत.
औरंगाबाद : पारनेर अपडेट मिडिया
हिंदू धर्म संस्कृतीमधील सर्वात मोठा सण म्हणून ओळख असलेल्या दिवाळीला आगळया वेगळया पध्दतीने साजरी करण्याचा निर्धार औरंगाबादच्या शिवसैनिकांनी केला आहे. दिपावलीचे औचित्य साधून यंदाची दिवाळी ध्वज दिवाळी म्हणून साजरी करण्याचा संकल्प औरंगाबाद येथील शिवसैनिकांनी केला असून त्यानिमित्ताने शहरातील तब्बल ५० हजार घरांवर भगवे ध्वज उभारण्यात येणार आहेत. पक्षाचे जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांनी ही माहीती दिली.
गुरूवारी दिवाळीच्या दिवसापासून तिन दिवसांच्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील सर्व स्मशानभुमींमधील स्मशानजोगी कुटूंबांना शिवसेना महिला आघाडीच्या वतीने भाऊबिजेची भेट देण्यात येणार आहे. दिवाळीच्या दिवशी पहाटे घाटीच्या शासकिय वैद्यकिय महाविदयालयातील रूग्णांच्या नातेवाईकांसाठी पहाटे ५ ते ७ या वेळेमध्ये अभ्यंगस्नाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. गरम पाणी, उटणे, साबणाची व्यवस्था यावेळी करण्यात येईल. आकाश कंदीलाच्या धर्तीवर ठिकठिकाणी ‘विकास दीप’ लावण्यात येणार असून शहरातील निवडक २०० ठिकाणी ते लावण्यात येतील.
दि. ७ रोजी बीड बायपास, फटाका मार्ट, टीव्ही सेंटर, छत्रपती संभाजी महाराज मैदान, नारळीबाग पावन गणपतीमंदीर परिसत येथे विद्यार्थ्यांसाठी किल्ले बनवा ही स्पर्धा आयोजित करण्यात येईल. याच दिवशी ‘मी सावरकर बोलतोय’ या नाट्यप्रयोगाचे तापडीया नाट्यमंदीरात आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.