पुणे : पारनेर अपडेट मिडिया
पिंपरखेड, ता. शिरूर येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेतू दि. २१ ऑक्टोबर रोजी दुपारी सव्वा एक वाजण्याच्या सुमारास ३२ लाख ५२ हजार ५६० रूपयांची रोकड तसेच २ कोटी ४७ लाख २० हजार ३९० रूपये किमतीचे सोन्याचे दागिणे असा एकूण २ कोटी ७९ लाख रूपयांचा ऐवज लुटणाऱ्या टोळीला पुणे ग्रामिण गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून २ कोटी ३६ लाख ४२ हजार रूपयांचा मुद्देमाल निघोज येथून हस्तगत करण्यात आला. आरोपींमध्ये डॉलर उर्फ प्रविण सिताराम ओव्हाळ, (रा. वाळद, ता. खेड, जि. पुणे), अंकुर महादेव पाबळे (रा. कावळपिंपरी ता. जुन्नर जि. पुणे), धोंडीबा महादू जाधव (रा. निघोज कुंड, ता. पारनेर जि. नगर), आदिनाथ मच्छिंद्र पठारे, (रा. पठारवाडी, ता. पारनेर) विकास सुरेश गुंजाळ (रा. टाकळीहाजी, ता. शिरूर, जि. पुणे) यांचा समावेश असून त्यांना अटक करण्यात आल्याची माहीती पुणे ग्रामिण पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी पुणे येथे पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परीषदेमध्ये देण्यात आलेल्या माहीतीनुसार गेल्या मागिल तिन महिन्यांपासून या बँकेच्या शाखेवर दरोडा टाकण्याची पूर्व तयारी करण्यात येत होती. त्यासाठी टोळीचा प्रमुख डॉलर उर्फ प्रविण सिताराम ओव्हाळ याने मध्यप्रदेशातून ३ पिस्टल मागविले होते. गुन्हयासाठी दोन वाहनांचा वापर करण्यात आला असून मेटॅलिक रंगाची सियाज कार (क्र. एम. एच. ०५ सी एम १२९३) ही आरोपींनी गुन्हा करण्यासाठी वापरली. त्यासाठी तिचा रंग पांढरा करून घेण्यात आला होता. दरोडयानंतर ही कार मध्यप्रदेशात नेण्यात येऊन तिचा रंग पुन्हा बदलून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न झाल्याचे तपासात निष्पन्न झाले. दरोडा टाकल्यानंतर पोलिसांना चकवा देण्यासाठी सियाज कारमधून नेण्यात येत असलेला ऐवज निळया रंगाची बलेनो कार (क्र. एम. एच. १४ एस एम ०७०७) मध्ये टाकून मुददेमाल लंपास करण्यात आला.
आरोपींनी स्वतःची ओळख लपून रहावी म्हणून गुन्हा करताना एकाच रंगाचे जॅकेट, शुज, ट्रॅक पॅन्ट, हॅण्डग्लोज, मास्क खरेदी करून गुन्हयाच्या वेळी त्याचा वापर केला. दरोडा यशस्वी झाल्यानंतर त्यांनी हे सर्व कपडे जाळून टाकण्याचीही शक्कल लढविली.
हा दरोडा डॉलर उर्फ प्रविण सिताराम ओव्हाळ याने साथीदारांना बरोबर घेऊन केल्याची माहिती पुढे आली. त्याचा शोध घेतला असता तो दरोडयानंतर मध्यप्रदेशात गेल्याचे समजले. त्यासाठी एक पथक मध्यप्रदेशात रवाना करण्यात आले होते. मात्र या पथकाला तो तेथे मिळून आला नाही. तो निघोज ता. पारनेर येथे आरोपी धोंडिबा जाधव यांच्याकडे येणार असल्याची माहीती मिळाल्यानंतर पोलिसांनी गुरूवारी रात्री सापळा रचून त्याच्यासह धोंडिबा जाधव यास निघोज येथे ताब्यात घेतले. जाधव याने कुंडावर उसाच्या शेतात दडवून ठेवलेला मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. त्यानंतर इतर आरोपींच्या मुसक्या अवाळण्यात आल्या.
या गुन्हयाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक शेळके, सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन काळे, संदीप येळे, नेताजी गंधारे, सहा पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, उपनिरीक्षक अमोल गोरे, रामेश्वर धोंडगे, तुषार पंदारे, शब्बीर पठाण, जनार्दन शेळके, राजू मोमीन , दिपक साबळे, विक्रम तापकीर, सचिन घाडगे, विजय कांचन, अजय घुले, अनिल काळे, रविराज कोकरे, योगेश नागरगोजे, गुरू जाधव, अभिजित एकशिंगे, स्वप्निल नवले, प्रसन्न घाडगे, अक्षय नवले, निलेश गुंड, समाधान नाईकनवरे, दगडू विरकर यांनी केला. त्यांना शिरूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुरेशकुमार राउत, सहा निरीक्षक संदीप कांबळे, जगदाळे, पडळक, जाधव, चरापले, पठाण, भगत, अमित कडूस, साठे, नितिन सुद्रीक, बाळासाहेब भवर, शिंदे, जगताप, संंजू जाधव ,नागलोत, नेमाणे, साळवे, जंगम, गुणवरे, पिठले, साळुंके यांनी मदत केली.
सबंधित बातमी वाचा