पारनेर : पारनेर अपडेट मिडिया
जवळे येथील दहाव्या इयत्तेत शिकणाऱ्या १५ वर्षीय शाळकरी मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणी भाजपा महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ (BJP Leader Chitra Wagh) यांनी सोमवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास जवळे येथे येऊन पिडीत कुटूंबाचे सांत्वन केले. “सरकार रांझाच्या पाटलांना पाठीशी घालतंय” असे व्टिट करून वाघ यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधलाय !
नगर-पारनेर १५ वर्षीय मुलीवर लैंगिकअत्याचार करून हत्या आरोपी अद्याप फरार
तर
पारनेर ग्रामीणरूग्णालय महिलाडॉक्टर आज ही न्यायाच्या प्रतिक्षेत..पण सरकार रांझाच्या पाटलाला पाठीशी घालतयं..ज्यामुळे मिळतयं विकृतांना बळशिवछत्रपती असते तर जागीचं न्याय आणि दुराचारी अत्याचार्याची लंका भस्म pic.twitter.com/ItuStM4XIQ
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) October 25, 2021
दि. २० ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास जवळयातील बारशिले वस्तीवर घरी एकट्या असलेल्या १५ वर्षीय शाळकरी मुलीवर अत्याचार करण्यात येऊन तिची हत्या करण्यात आली. हे प्रकरण घडल्यानंतर संपूर्ण तालुक्यात संतापाची भावना असतानाही पोलिस तपासात अद्यापही काहीही उघडकीस आलेले नाही. स्थानिक पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेचे पथक कसून चौकशी करीत असतानाही भर वस्तीमध्ये घडलेल्या या घ्रुण कृत्यचा पोलिसांना छडा लावण्यात अपयश येत असल्याबददल अश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
शाळकरी मुलीवर अत्याराची घटना घडल्यानंतर महाविकास आघाडीवर तुटून पडणाऱ्या भाजपा महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी मुंंबईहून जवळे (ता. पारनेर) येथे येऊन पिडीत कुटूंबाची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. कुटूंबास धिर देत भारतीय जनता पक्षाच्या वतीने त्यांना एक लाखाचा धनादेशही सुपूर्द केला. यावेळी बोलताना वाघ यांनी सत्ताधारी महाविकास आघाडीवर निशाणा साधण्याची संधी मात्र सोडली नाही. पारनेर तालुक्यात महिलांवरील अत्याचार, अन्यायाविरोधासाठीच यावे लागते असे सांगत त्यांनी राष्ट्रवादीलाही डिवचले.
वाघ यांनी पिडीत कुटूंबाचे सांत्वन केल्यानंतर नगर येथे जात पोलिस अधिक्षक मनोज पाटील (SP Ahmednagar) यांची भेट घेत या प्रकरणाच्या तपासाविषयी माहीती घेतली. नगरच्या दौऱ्यानंतर त्यांनी व्टिट करीत “पारनेर येथील १५ वर्षीय मुलीवर अत्याचार करून आरोपी अद्याप फरार तर पारनेर ग्रामिण रूग्णालयातील महिला डॉक्टर आजही न्यायाच्या प्रतिक्षेत. पण सरकार रांझाच्या पाटलाला पाठीशी घालतंय. ज्याच्यामुळे मिळतंय विकृतांना बळ. शिवछत्रपती असते तर जागीच न्याय आणि दुराचारी अत्याचाऱ्यांची लंका भस्म झाली असती” अशा भावना वाघ यांनी व्यक्त केल्या आहेत.