जवळे : पारनेर अपडेट मिडिया
भाजपा महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी सोमवारी जवळे येथे दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास भेट देत पिडीत मुलीच्या कुटूंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. महिलांवरील अन्याय अत्याराविरोधातच पारनेर तालुक्यात यावे लागते अशी खंत वाघ यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.
इयत्ता दहावीत शिकणाऱ्या शाळकरी मुलीवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आल्यानंतर अद्यापही आरोपीचा शोध लागलेला नाही. वाघ यांनी त्याबाबत चिंता व्यक्त करून आरोपींचा तात्काळ शोध घेउन त्यांना कठोर शासन होईल अशा प्रकारचे गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. हे कुटूंब ज्या वस्तीमध्ये राहते तेथील कोणीही माहीती देत नाही का अशी विचारणा करतानाचा आजू बाजूच्या लोकांवर कोणी दहशत तर निर्माण करीत नाही ना ? अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली. राज्यात महिलांवर दररोज अत्याचार होत असून ते रोखण्यात सरकार सपशेल अपयशी ठरल्याचे त्यांनी सांगितले. मुलीवर झालेल्या अत्याचारासबंधी कुटूंबातील सदस्यांना काही माहीती आहे का याचीही त्यांनी माहीती घेतली.
या कुटूंबाच्या भेटीनंतर वाघ यांनी नगर येथे जाऊन पोलिस अधिक्षकांची भेट घेतली. यावेळी जि. प. चे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे, तालुकाध्यक्ष वसंत चेडे, भैयया गंधे, बडवे काका, रामदास घावटे, बाळासाहेब सालके, नवनाथ सालके, अमोल मैड, बबनराव आतकर, महेंद्र आढाव, शेखर सोमवंशी
सरपंच अनिता आढाव, सोनाली सालके
कनिफनाथ पठारेआदी उपस्थित होते.
भाजपच्यावतीने एक लाखांची मदत
पीडित कुटुंबाला भारतीय जनता पक्षाच्या वतीने १ लाख रुपयांची देणगी देण्यात आली. वाघ यांनी मदतीचा धनादेश कुटुंबाला सुपूर्द केला.