parnerupdate.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • गुन्हे
  • शैक्षणिक
  • धार्मिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • गुन्हे
  • शैक्षणिक
  • धार्मिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
parnerupdate.com
No Result
View All Result

आता सुप्याच्या स्टेट बँकेची दिवसाढवळया चोरी !

Parner Update Media by Parner Update Media
October 31, 2021
in गुन्हे
0
आता सुप्याच्या स्टेट बँकेची दिवसाढवळया चोरी !

२४ तास वर्दळ असूनही चोरट्यांनी साधला डाव : पोलिसांचा धाक राहिला की नाही ?

सुपे : पारनेर अपडेट मिडिया

बँकांवर दरोडे टाकून रोकड, सोने लुटून नेण्याच्या घटना सुरूच असताना आता सुपे ता. पारनेर येथील स्टेट बँकेच्या एटीएमच्या १०० अ‍ॅम्पीअरच्या ८ बॅटऱ्या अज्ञात चोरटयाने दिवसा ढवळ्या चोरून नेल्या आहेत. विशेष म्हणजे हे एटीएम सुपे पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असून २४ तास वर्दळ असलेल्या कंपनी संचलीत पेट्रोल पंपावर आहे !

यासंदर्भात स्टेट बँकेच्या सुपे शाखेचे व्यवस्थापक मनिष भाविदकुमार (वय २७ रा.दिल्ली, हल्ली रा. इंद्रप्रस्थ कॉलनी, पाईपलाईन रोड अ. नगर) यांनी सुपे पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. दि. २९ ऑक्टोबर रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्याने ३२ हजार रूपये किमतीच्या आठ बॅटऱ्या चोरून नेल्याचे फिर्यादीमध्ये नमुद करण्यात आलेले आहे.

नगर पुणे महामार्गावर हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीचा कंपनी संचलीत पंप असून या महामार्गावरील सर्वाधिक ग्राहकांची संख्या असलेला हा पंप आहे. त्यामुळे २४ तास या पंपावर वर्दळ असते. ग्राहकांच्या मोठया संख्येमुळे जवळपास ५० ते ६० कर्मचारी तेथे काम करतात. असे असतानाही भर दिवसा दुपारी चार वाजण्याच्या सुमरास चोरट्याने बॅटऱ्या चोरून नेल्याने अश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे. या पंपावर हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीचे सुरक्षा रक्षकही आहेत. स्टेट बँकेच्या एटीएमसाठी मात्र सुरक्षा रक्षकाची नेमणूक करण्यात आलेली नाही.

गुन्हा दाखल झाल्यानंतर तपासी अंमलदार साहेबराव ओहळ यांनी घटनास्थळी जाऊन कंपनीच्या सीसी टिव्हीची पडताळणी केली असता एटीएमच्या दिशेने एकही कॅमेरा नसल्याचे त्यांनी सांगितले. तर बँकेचे सीसी टिव्ही फुटेज मात्र अद्याप प्राप्त झालेले नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. बँकेचे फुटेज मिळाल्यानंतरच आरोपींचा शोध घेणे शक्य होईल असेही त्यांचे म्हणणे आहे.

मिळालेल्या माहितीनुसार एटीएमसाठी पंपानेे केवळ जागा भाडयाने दिलेली आहे. त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी आमची नसल्याचे सांगत कंपनीच्या स्थानिक व्यवस्थापकाने हात वर केले आहेत.
पंप नव्याने सुरू झाला त्यावेळी कंपनीस तेथे स्टेट बँकेचे एटीएम हवे होते. आता मात्र ते कंपनीस नकोसे झाले आहे. त्यासाठी एटीएमची जागा खाली करण्यासंदर्भात बँकेकडे कंपनी व्यवस्थापनाने पत्रव्यवहार केला आहे. परंतू सन २०२५ पर्यंत करार असल्याने बॅक एटीएमची जागा सोडत नसल्याचीही माहीती पुढे आली आहे.

दरम्यान, पन्नास ते साठ कर्मचारी उपस्थित असताना, ग्राहकांचा कायम राबता असताना या पंपावरून तब्बल आठ बॅटऱ्या ते ही दुपारी चार वाजता चोरून नेण्याची धाडस नेमके कोणी केले असावे ? हा संशोधनाचा भाग आहे. शिवाय हाकेच्या अंतरावर सुपे पोलिस ठाणे असतानाही चोरटे दिवसाढवळया चोरी करतात याचा अर्थ सुपे पोलिसांचा आरोपींवर धाक राहिला की नाही असा प्रश्‍न उपस्थित होतो आहे.

काही दिवसांपूर्वी याच रस्त्यावरून चंदनाच्या झाडांची चोरी झाली. नारायणगव्हाण येथे आदीत्य चोपडा या तरूण ठेकेदाराचा मृतदेह विहीरीत आढळून आला. त्याचाही शोध अदयाप लागलेला नाही. असे असताना दिवसा ढवळया पेट्रोल पंपावरील एटीएमच्या बॅटया चोरी जातात याचा अर्थ गुन्हेगारांवरील पोलिसांचा वचक कमी झाल्याचेच हे द्योतक आहे.

गॅस व डांबराची तस्करी !

नगर – पुणे महामार्गावर गॅस टँकरमधील गॅसची तस्करी करण्यात येते. टँकरमधून धोकादायक पध्दतीने गॅसच्या टाक्या भरल्या जातात. या टाक्यांची विक्री नगर शहरापर्यंत केली जाते. डांबर टँकरमधील डांबराची तस्करी करून त्या डांबरात भेसळ केली जाते. तेच डांबर जिल्हयातील विविध रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी वापरले जाते. स्फोटकांच्या काळया व्यवसायाचेही हे केंद्र तयार झालेले आहे. सुपे पोेलिस मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळेच गुन्हेगारी प्रवृत्ती दिवसेंदिवस बाळसे धरू लागली आहे. पोलिस अधिक्षक मनोज पाटील, उपअधिक्षक अजित पाटील याची कधी नोंद घेणार असा प्रश्‍न आहे.

Previous Post

‘चायना’ ची बत्ती गुल ! भारतीयांचा बहिष्कार : ५० हजार कोटींना चुना !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आता सुप्याच्या स्टेट बँकेची दिवसाढवळया चोरी !

आता सुप्याच्या स्टेट बँकेची दिवसाढवळया चोरी !

October 31, 2021
?चायना? ची बत्ती गुल ! भारतीयांचा बहिष्कार : ५० हजार कोटींना चुना !

‘चायना’ ची बत्ती गुल ! भारतीयांचा बहिष्कार : ५० हजार कोटींना चुना !

October 31, 2021
५० हजार घरांवर फडकणार भगवे ध्वज ! या शहरात होणार ध्वज दिवाळी !

५० हजार घरांवर फडकणार भगवे ध्वज ! या शहरात होणार ध्वज दिवाळी !

October 31, 2021
आजी आजोबांवर नातवांनी केले कोयत्याने वार : दोघेही गंभीर जखमी

श्रीगोंद्यात ९ लाखांचा गांजा जप्त : उत्तर महाराष्ट्रात ४.६ कोटींचे आंमली पदार्थ जप्त

October 31, 2021
सोमय्यांचा बार फुसका ! आता म्हणतात, दिवाळीनंतर फटाके फोडणार !

सोमय्यांचा बार फुसका ! आता म्हणतात, दिवाळीनंतर फटाके फोडणार !

October 31, 2021
शनिवारी रात्री स्लॅब कोसळला : १२ मजुर जखमी : ६ अत्यावस्थ

शनिवारी रात्री स्लॅब कोसळला : १२ मजुर जखमी : ६ अत्यावस्थ

October 31, 2021
Load More
  • Home
  • Sample Page
  • आ. लंके राष्ट्रवादीचा सामाजिक चेहरा-पद्मश्री पवार

© 2021 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • गुन्हे
  • शैक्षणिक
  • धार्मिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

© 2021 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!
WhatsApp Group
satta king gali