parnerupdate.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • गुन्हे
  • शैक्षणिक
  • धार्मिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • गुन्हे
  • शैक्षणिक
  • धार्मिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
parnerupdate.com
No Result
View All Result

राज्यपाल आले, आणि भोज्याला शिऊन निघून गेले !

Parner Update Media by Parner Update Media
October 28, 2021
in राजकीय, सामाजिक
0
राज्यपाल आले, आणि भोज्याला शिऊन निघून गेले !

राज्यपाल कोश्यारी यांचा राळेगणसिध्दी दौरा : येण्याची आणि जाण्याचीही घाई ।

राळेगणसिध्दी : पारनेर अपडेट मिडिया

नगर जिल्हयाच्या दौऱ्यावर आलेल्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी गुरूवारी दुपारी अर्धा तासासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या राळेगणसिध्दीस भेट दिली. हजारे यांनी राळेगणसिध्दीत उभ्या केलेल्या कामाचा विचार केला तर राज्यपाल आले, आणि भोज्याला शिऊन निघून गेले असेच त्यांच्या दौऱ्याचे वर्णन करावे लागेल.

दुपारी ३ वाजून ३५ मिनिटांनी राज्यपालांचे राळेगसिध्दीत आगमण झाले. हेलीपॅडवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी त्यांचे स्वागत केले. हेलीपॅडवरून राळेगणसिध्दी गावात येतानाच प्लास्टिक अस्तरीकरण केलेला कोहिनी नाला बंदिस्त, ग्याबियन कम्पोजिट बंधाऱ्याची पाहणी केली.

राळेगणसिध्दीत हजारे हे वास्तव्य करीत असलेल्या संत यादवबाबा मंदीरास त्यांनी भेट दिली. मंदीरातून तात्काळ मागे फिरून ते तडक कार्यकर्ता प्रशिक्षण केंद्रातील हजारे यांच्या आंदोलनासंदर्भातील छायाचित्रांच्या संग्रहालयास भेट देण्यासाठी ते निघाले. मात्र त्याआगोदर तेथे ग्रामस्थांशी संवदाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र मंदीराच्या पायऱ्यांवरूनच ग्रामस्थांशी केवळ अर्ध्या मिनिटांचा संवाद करून ते पुढे निघाले.

कार्यकर्ता प्रशिक्षण केंद्रामध्ये नव्याने उभारण्यात आलेल्या आंदोलनाच्या छायाचित्रांच्या संग्रहालयास राज्यपालांनी घाईतच भेट दिली. त्यानंतर तेथेच असलेल्या संपर्क कार्यालयात बसून त्यांनी दोन घोट चहा घेेतला व ते मुंबईकडे जाण्यासाठी निघाले. दुपारी चार वाजता त्यांचे हेलीकॉप्टर राळेगणसिध्दीमधून निघूनही गेले.

ग्रामस्थांशी अर्ध्या मिनिटाचा संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच भाजपाचा प्रचार करण्यास मात्र ते विसरले नाहीत ! राळेगणसिध्दी परीवाराला अण्णा हजारे यांंनी रस्ता दाखविला, आम्हाला आणि पंतप्रधान नरेंद्र मोंदींनाही अण्णांनीच रस्ता दाखविल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. हजारे यांनी सोलरचा प्रकल्प राबविला आहे. तसेच प्रकल्प मोदी हे देशभर राबवित आहेत. हजारे यांना अभिप्रेत असणारे काम मोदी करीत असल्याचे सांगत त्यांनी भाजपाचा प्रचार करण्याची सांधी अर्ध्या मिनिटांच्या कालावधीतही सोडली नाही !

राज्यपाल कोश्यारी यांचा राळेगणसिध्दी दौरा अचानक जाहिर झाला. त्यांचा शासकिय कार्यक्रम जाहिर झाला, त्यावेळी हजारे यांच्या कार्यालयास पुसटशीही कल्पना नव्हती. अचानक दौरा ठरवूनही राळेगणसिध्दी परिवाराने महामहीम राज्यपालांच्या स्वागताची जय्यत तयारी केली होती, मात्र धावत्या भेटीमुळे ग्रामस्थांचा पुरता हिरमोड झाला !

Previous Post

कृषी तंत्रज्ञान शिक्षण मराठी भाषेतून देण्याची गरज : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज्यपाल आले, आणि भोज्याला शिऊन निघून गेले !

राज्यपाल आले, आणि भोज्याला शिऊन निघून गेले !

October 28, 2021
कृषी तंत्रज्ञान शिक्षण मराठी भाषेतून देण्याची गरज : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

कृषी तंत्रज्ञान शिक्षण मराठी भाषेतून देण्याची गरज : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

October 28, 2021
आयसीयू ८ टक्के, तर व्हेंटिलेटर ७ टक्के बेड शिल्लक !

गुरुवारची जिह्यातील करोना रुग्ण संख्या

October 28, 2021
कांद्याच्या भावात ५०० रुपयांची वाढ !

कांद्याचे गुरुवारचे राज्यातील बाजारभाव

October 28, 2021
नरेंद्र मोदी यांना अण्णा हजारे यांनी रस्ता दाखविला ! : राज्यपाल कोश्यारी यांचे मोठे विधान

नरेंद्र मोदी यांना अण्णा हजारे यांनी रस्ता दाखविला ! : राज्यपाल कोश्यारी यांचे मोठे विधान

October 28, 2021
महिलेवर बलात्कार, विद्यालयात चोरी, दारूड्याकडून महिलेस मारहाण

बँक ग्राहकांचे पैसे लांबविणारी आंतरराज्यीय टोळी जेरबंद : नगर पोलिसांची कारवाई

October 28, 2021
Load More
  • Home
  • Sample Page
  • आ. लंके राष्ट्रवादीचा सामाजिक चेहरा-पद्मश्री पवार

© 2021 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • गुन्हे
  • शैक्षणिक
  • धार्मिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

© 2021 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!
WhatsApp Group
satta king gali