राजे यांच्या उपक्रमांचे केले कौतुक
पारनेर : पारनेर अपडेट मिडिया
सुपे येथे विस्तारीत औदयोगिक वसाहतीमध्ये स्थानिक भुमिुपत्रांना न्याय मिळाला पाहिजे. नोकऱ्या तसेच विविध कॉट्रॅक्टमध्येही स्थानिकांना प्राधान्य हवे. कारखानदाराच्या हिताबरोबरच सामान्यांचेही हित जोपासणे गरजेचे असल्याचे मनसेच्या महाराष्ट्र राज्य कामगार सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष असगरभाई शेख यांनी सांगितले. पारनेर शहर अध्यक्ष वसीम राजे पक्ष वाढीसाठी राबवत असलेल्या उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले.
सुपे येथे औद्योगिक वसाहतींमधील प्रश्नांसदर्भात शेख यांनी भेट देत तरूणांशी चर्चा केली. त्यानंतर पारनेर येथे त्यांनी पारनेर शहराध्यक्ष वसीम राजे यांच्या निवासस्थानी भेट देऊन पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी तालुकाध्यक्ष बाळासाहेब माळी व शहराध्यक्ष वसीम राजे यांनी शेख यांचा सत्कार केला. यावेळी जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, सचिव नितिन भुतारे, जिल्हा उपाध्यक्ष पप्पू लामखडे, मारूती रोहोकले, तालुका उपाध्यक्ष सतिश म्हस्के, प्रकाश राजदेव, महेंद्र गाडगे, भाउसाहेब खेडेकर, सचिव जालींदर बांडे, अविनाश पवार, अक्षय सुर्यवंशी, लखन साळे, माउली पवार आदी उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना शेख यांनी आगामी जि. प. पं. स. तसेच बाजार समिती व नगर पंचायत निवडणूकीत पक्षाचे उमेदवार ताकदीने उतरूवून यश खेचून आणण्याचा सल्ला दिला. पारनेर शहराध्यक्ष वसीम राजे हे विविध उपक्रम राबवून पक्ष वाढीसाठी नेहमीच प्रयत्नशील असतात. पक्षाचे वरीष्ठ नेतेही त्यांच्या उपक्रमांचे कौतुक करतात. त्यांचा आदर्श इतर पदाधिकयांनी घेउन पक्षाची तालुक्यातील प्रतिमा उंचावण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले. गावोगावी मनसेच्या शाखा सुरू करून पक्ष बळकट करा असेही ते म्हणाले.