उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही : नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक पवारांच्या भेटीला
मुुंबई : पारनेर अपडेट मिडिया
पारनेर नगरपंचायतीच्या निवडणूकीत राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके यांनी राष्ट्रवादीचा झेंडा फडकवून गड जिंकलाय, आता शहराच्या विकासासाठी हवा तेवढा निधी देतो अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंंत्री अजितदादा पवार यांनी दिली. शहरात संघर्ष करीत आमदार नीलेश लंके यांना साथ दिलेल्या नवविर्वाचित नगराध्यक्ष विजय औटी यांचे पवार यांनी यावेळी विशेष कौतुक केले.
नगरपंचायतीच्या सार्वत्रीक निवडणूकीमध्ये पारनेर नगरपंचायतमध्ये त्रिशंकु अवस्था निर्माण झालेली होती. राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वाधिक ७ जागा मिळाल्या होत्या. कोणत्याही परिस्थितीत नगरपंचायतीची सत्ता ताब्यात घेण्याचा चंग बांधलेल्या आमदार नीलेश लंके यांच्यासोबत शहर विकास आघाडीने जाण्याचा निर्णय निकाला जाहिर झाल्यानंतर काही तसातच घेतला. पुढे अपक्ष नगरसेवक योगेश मते यांनीही विकासाच्या मुद्यावर राष्ट्रवादीची वाट धरली. शहर विकास आघाडीसोबत असेलेले भाजपाचे नगरसेवक अशोक चेडे यांनीही विकास हाच अजेंडा डोळयासमोर ठेवत राष्ट्रवादीला साथ देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे दोनच दिवसांत राष्ट्रवादीचे संख्याबळ ११ जागांवर जाउन पोहचले होते.
मंगळवारी दि. २२ रोजी नगराध्यक्ष तसेच उपनगराध्यक्ष यांचा शानदार पदग्रहण सोहळा पार पडला. अगदी लोकसभा, विधानसभेच्या मंत्र्यांचा शपथविधी पार पडतो तशा शपथविधीचे आयोजन करण्यात येऊन शहर विकासाचा निर्धार करण्यात आला. शपथविधीच्या या कार्यक्रमाची राज्यपातळीवरील माध्यमांनीही दखल घेतली.
पदग्रहणानंतर शहर विकासाचा ध्यास घेतलेल्या आमदार नीलेश लंंके यांनी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष तसेच नगरसेवकांना मुुंबई येथे घेऊन जात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घडवून आणली. पवारांनी सर्व पदाधिकाऱ्यांचे स्वागत करीत ‘नीलेशने गड जिंकला’ असल्याच्या भावना व्यक्त केल्या. ‘आता शहराचा विकास करण्याचे ध्येय बाळगा’, हवा तेवढा निधी देण्याची ग्वाही अजितदांनी पदाधिका ऱ्यांना दिला. नीलेश मतदारसंघात जसे काम करतोय तसेच शहरातही काम करा, तुम्हाला नागरीक डोक्यावर घेतील असा सल्लाही पवार यांनी यावेळी दिला.
यावेळी आमदार नीलेश लंके यांच्यासह नगराध्यक्ष विजय औटी, उपनगराध्यक्षा सुरेखा भालेकर, उद्योजक अर्जुन भालेकर, नंदूशेठ औटी, नगरसेवक अशोक चेडे, नितीन अडसूळ, डॉ. विद्या कावरे, योेगेश मते, भुषण शेलार, प्रियंका सचिन औटी, कुमारी हिमानी नगरे, निता विजय औटी, सुभाष शिंदे यांच्यासह प्रमोद पवार, संतोष औटी मेजर, विशाल कावरे, पुष्काराज बोरूडे, अनिल औटी, दिनेश औटी, प्रशांत जाधव, अजिंक्य देशमुख, अक्षय औटी, प्रदीप औटी, गणेश औटी, बजरंग औटी, अमोल औटी, गणेश औटी, रोहन नगरे आदी यावेळी उपस्थित होते.
विजय औटींचे कौतुक
आमदार नीलेश लंके यांना पारनेर शहरातून साथ देणाऱ्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष विजय औटी यांचे अजितदादांनी यावेळी कौतुक केले. संघर्ष केलाय, आता चांगले काम करून दाखवा, तुम्हाला हवा तेवढा निधी देतो अशी ग्वाही पवार यांनी यावेळी दिली.
प्रभाग १३ व १४ मधील युवकांनी घेतली अजितदादांची भेट
नगराध्यक्ष विजय औटी यांचा प्रभाग क्रमांक १३ तसेच त्यांच्याच मळयातील माजी नगरसेवक नंदकुमार औटी यांच्या प्रभाग क्रमांक १४ मधील युवकांनी अजितदादांची विशेष भेट घेतली. विजय औटी, नंदकुमार औटी यांनी केलेल्या संघर्षाची दखल घेत विजय औटी यांना नगराध्यक्षपदाची संधी दिल्याबद्दल युवकांनी अजित पवार यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
बाजार समिती, जिल्हा परीषदही काबिज करा !
आगामी जिल्हा परीषद, पंचायत समीती तसेच बाजार समितीच्या निवणूकीतही असेच काम करून सत्ता काबिज करा असा सल्लाही अजित पवार यांनी आमदार नीेलेश लंके यांना यावेळी दिला. सर्व कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम केले तर काय होते याचे उदाहरण नगरपंचायत निवडणूकीत पहावयास मिळाले आहे. असेच काम यापुढील निवडणूकीतही होईल असा विश्वासही अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केला.