पारनेर : पारनेर अपडेट मिडिया
पारनेर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अपेक्षेप्रमाणे विजय सदाशिव औटी तर शिवसेनेच्या वतीने नवनाथ तुकाराम सोबले यांनी बुधवारी विहीत वेळेत अर्ज दाखल केले. औटी व युवराज पठारे यांची नावे नगराध्यक्षपदासाठी सुरूवातीपासूनच चर्चेत होती. मात्र शिवसेनेने ऐनवेळी नवनाथ सोबले यांचा अर्ज दाखल करण्याची खेळी करून संभाव्य डावपेचांना आळा घातला.
विजय औटी यांच्या अर्जावर यांनी सुचक म्हणून योगेश मते तर यांनी अनुमोदक म्हणून भूषण शेलार स्वाक्षरी केली आहे. तर शिवसेनेचे नवनाथ तुकाराम सोबले यांच्या अर्जावर यांनी विद्या अनिल गंधाडे सुचक तर निता देवराम ठुबे यांनी अनुमोदक म्हणून स्वाक्षरी केली आहे.
पारनेर नगरपंचायतीच्या निवडणूकीत राष्ट्रवादी ७, शिवसेना ६, शहर विकास आघाडी ३ तर भाजपाला व अपक्षाला प्रत्येकी १ जागा मिळाल्याने त्रिशंकू अवस्था निर्माण झाली होती. पुढे आमदार नीलेश लंके यांनी शहर विकास आघाडीचे तिन तर अपक्ष उमेदवाराला गळाला लावित बहुमताचा जादुई आकडा गाठला. या १० नगरसेवकांची गटनोंदणीही करण्यात आली आहे. शिवसेनेच्या वतीनेही अपक्ष नगरसेवकांना गळाला लावण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात त्यांना यश आले नाही. शिवसेनेच्या सहा नगरसेवकांचीही गट नोंदणी करण्यात आली आहे.
दुपारी दोन वाजल्यानंतर अर्जांची छाणनी करण्यात येईल. दि. १६ रोजी उपनगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करण्यात येउन दुपारी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष पदांची निवड करण्यासाठी नवनिर्वाचित नगरसेवकांच्या विशेष सभेचे आयोजन करण्यात येणार आहे.
हे आहेत प्रभागनिहाय नगरसेवक
प्रभाग क्र. १ शालूबाई कांतीलाल ठाणगे (शिवसेना), प्रभाग क्र. २ सुप्रिया सुभाष शिंदे (राष्ट्रवादी), प्रभाग क्र. ३ योगेश अशोक मते (अपक्ष), प्रभाग क्र. ४ नवनाथ तुकाराम सोबले (शिवसेना), प्रभाग क्र. ५ नितीन रमेश अडसूळ (राष्ट्रवादी), प्रभाग क्र. ६ निता विजय औटी (राष्ट्रवादी), प्रभाग क्र. ७ विदया अनिल गंधाडे (शिवसेना), प्रभाग क्र. ८ भुषण उत्तम शेलार (शहर विकास आघाडी), प्रभाग क्र. ९ हिमानी रामजी नगरे (राष्ट्रवादी), प्रभाग क्र. १० सुरेखा अर्जुन भालेकर (शहर विकास आघाडी), प्रभाग क्र. ११ अशोक फुलाजी चेडे (भाजपा), प्रभाग क्र. १२ डॉ. विद्या बाळासाहेब कावरे (राष्ट्रवादी), प्रभाग क्र. १३ विजय सदाशिव औटी (राष्ट्रवादी), प्रभाग क्र. १४ निता देवराम ठुबे (शिवसेना), प्रभाग क्र. १५ जायदा राजू शेख (शिवसेना), प्रभाग क्र. १६ युवराज कुंडलीक पठारे (शिवसेना), प्रभाग क्र. १७ प्रियंका सचिन औटी (राष्ट्रवादी)