प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी पारनेरकरांचं पाणी गुणकारी !

0
6673

भाळवणीच्या आयुहेल्थच्या ५ हजार बाटल्यांची भेट

२ लाखांची मदतही : चोंभूतच्या शेळके ग्रुपची रूग्णसेवा

पारनेर : पारनेर अपडेट मिडिया

तालुक्यातील चोंभूत येथील रहिवासी नीलेश शेळके यांच्या शेळके ग्रुपच्या ऑक्सीकुल आयुहेल्थ या आयुर्वेदिक गुणधर्म असलेल्या ५ हजार पाण्याच्या बाटल्या भाळवणी येथील शरदचंद्र पवार आरोग्य मंदीरास भेट देण्यात आल्या. आरोग्य मंदीराच्या इतर खर्चासाठी शेळके ग्रुपतर्फे २ लाखांचा धनादेशही आ. नीलेश लंके यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

गुरूवारी शेळके ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक नीलेश शेळके, संचालक मिलिंद शेळके, मुख्य कार्यकारी अधिकारी जुगलकिशोर आसावा यांनी भाळवणी येथे येऊन ही मदत आ. लंके यांच्याकडे सुपूर्द केली. या पाण्यासंदर्भात माहीती देताना नीलेश शेळके यांनी सांगितले की, कोरोना परिस्थितीमध्ये रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी ऑक्सीकुल या ब्रॅन्डने आयुहेल्थ नावाचे आयुर्वेदीक तत्वयुक्त पाणी तयार केले आहे. त्यातील तुळस ही श्‍वसनाचा आजार बरा करण्यासाठी मदत करते. सुंठ ही सर्दी व खोकल्यासाठी उपायकारक आहे. दालचिनी शरीरातील तापमान समतोल राखण्यास मदत करते. तर अश्‍वगंधा उर्जा व शक्ती वाढविण्यास मदत करते. असे सर्व घटक असलेले पाणी रूग्णांसाठी उपयुक्त ठरत आहेत.

भारतात सर्वात प्रथमच कल्पकतेने तयार करण्यात आलेले हे पाणी आयुर्वेदीक शास्त्रानुसार रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास निश्‍चितच मदत करू शकते. आयुहेल्थ नावामध्येच आयु म्हणजे आयुष्य व हेल्थ म्हणजे आरोग्य आहे. ते आरोग्यासाठी अतिशय मोलाचे असून त्यातील आयुर्वेदीक तत्व शरीरास निरोगी ठेवण्यास मदत करतात. सगळया वयोगटातील लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत हे पाणी उपयुक्त ठरत असल्याचे शेळके यांनी सांगितले.

Safalta

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here