लसीकरणासाठी गुरुजींवर आत्मक्लेशाची पाळी !

0
421

शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण ठुबे यांची माहिती

अहमदनगर : पारनेर अपडेट मिडिया

कोरोना महामारीत विविध कामांची जबाबदारी टाकण्यात येऊनही केवळ फ्रंट लाईन वर्कर म्हणून सबोधले न गेल्याने प्राथमिक शिक्षक लसीकरणापासून वंचित आहेत. शिक्षकांच्या लसीकरणासाठी शिक्षक परिषद क्लेश आंदोलन करणार असल्याची माहिती परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण ठुबे (गुरुजी) यांनी दिली.

प्राथमिक शिक्षकांना कोरोणा संबंधित विविध प्रकारच्या नियुक्त्या महसूल व आरोग्य विभागाकडून बजावण्यात आल्या आहेत. शासनाने कोविड संबंधी कामे करणा-या सर्व कर्मचा-यांचे फ्रंटलाइन वर्कर म्हणून प्राधान्याने लसिकरण केले आहे.परंतु प्राथमिक शिक्षक कोविड संबंधी कुटूंब सर्वेक्षण, कॉन्टँक्ट ट्रेसिंग, चेकपोष्ट, कोविड सेंटर , लसिकरण केंद्र , डाटा एन्ट्री आदी ठिकाणी आशा वर्कर व अंगणवाडी सेविका यांच्याबरोबरीने काम करत आसूनही केवळ फ्रंटलाइन वर्कर म्हणून संबोधित न केल्यामुळे प्राथमिक शिक्षकांचे लसीकरण होऊ शकले नाही.

शेजारच्या पुणे,औरंगाबाद, जालना, नाशिक आदि जिल्ह्यात इतर कर्मचाऱ्यांप्रमाणेच शिक्षकांचेही लसिकरण झाले परंतु अहमदनगर जिल्ह्यात संघटनेने वेळोवेळी मागणी करूनही प्रशासन लसिकरणाबाबत गंभीर नाही. सदर बाबीची साधी दखल देखील घेतलेली नाही. परंतू वेगवेगळ्या प्रकारच्या कोविड संदर्भात कामाचे आदेश मात्र प्रशासनाकडून बजावले जात आहेत.

आज अखेर जिल्ह्यात ३० शिक्षक बांधवांना आपला जीव गमवावा लागला आहे. जिल्ह्याच्या शासकीय यंत्रणे पैकी कोणतेही केडर लसीकरणा शिवाय काम करत नाही. अगदी घरोघरी जाऊन प्राथमिक शिक्षक कुटुंब सर्वेक्षण करत आहेत. आमच्या जीवाची तुम्हाला पर्वा नसेल तर मग काम तरी कशाला देता असा जळजळीत प्रश्न ठुबे यांनी निवेदनाद्वारे उपस्थित केला आहे .

जर प्रशासनाला शिक्षकांच्या जीवाची पर्वा नसेल तर अशा गोष्टीचा प्रतिनिधीक निषेध म्हणून,शिक्षक परिषदेचे कार्यकर्ते दिनांक १८.०५.२०२१ रोजी १ दिवसाचे आत्मक्लेष व अन्नत्याग आंदोलन करणार आहोत. आमची या निवेदनाद्वारे जिल्हा प्रशासनाला विनंती आहे की, प्रत्येक तालुक्यात ज्या शिक्षकांचे लसीकरण झालेले नाही. त्या शिक्षकांचे विशेष मोहिम राबून सरसकट तालुकास्तरावर स्वतंत्र १ दिवसाचे लसीकरण सत्र आयोजीत करण्याचे आदेश निर्गमित करावेत , अन्यथा प्रशासनाच्या निषेधार्त १ दिवसाचे अंदोलन केले जाईल. .

प्रशासनाने लसिकरणाशिवाय कोविडची कामे देऊन आणखी शिक्षकांचे जीव धोक्यात घालू नयेत अशी विनंती शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण ठुबे तसेच शिक्षक परिषदेचे राज्य उपाध्यक्ष संजय शेळके, नाशिक विभागीय अध्यक्ष राजेंद्र जायभाय, उच्चाधिकार समिती जिल्हाध्यक्ष आर.पी. राहाणे, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा मिनाक्षी तांबे कार्याध्यक्ष राम निकम, सरचिटणीस दत्ता गमे, कार्यालयीन चिटणीस गणेश वाघ, जिल्हा कार्यवाह रविंद्र कांबळे, सहकार्यवाह सुभाष गरुड, कोषाध्यक्ष तुषार तुपे, उच्चाधिकार समिती कार्याध्यक्ष प्रल्हाद गजभिव, उपाध्यक्ष गणपत सहाणे, उच्चाधिकार समिती सरचिटणिस शशी सावंत, राज्य प्रतिनिधी संजय म्हस्के, श्रीकृष्ण खेडकर, बाबा पवार, राजेंद्र थोरात, मिलींद तनपुरे, शंकर गाडेकर, तान्हाजी वाडेकर, उच्चाधिकार समिती कोषाध्यक्ष रघुराज खामकर, कार्यालयीन चिटणीस कल्याण राऊत, उत्तर जिल्हा प्रमुख भिमराज उगलमुगले, दक्षिण विभाग प्रमुख बाळासाहेब मगर, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख बाळासाहेब रोहोकले यांनी निवेदनाद्वारे जिल्हा आरोग्ययंत्रणेसह प्रशासनाला केली आहे.

आणखी किती शिक्षकांचे जीव घेणार ?

अहमदनगर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचे लसिकरणाबाबत शिक्षक परिषदेच्या राज्यनेतृत्वाचेही लक्ष्य वेधण्यात आले असून शिक्षक परिषदेचे संस्थापक आमदार संजय केळकर यांनी याबाबत अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेशी दूरध्वनी वरून संपर्क करून लसिकरणशिवाय कोविडसंदर्भातील कामे करायला लावून आणखी किती प्राथमिक शिक्षकांचे जीव घेणार आहात असा प्रश्न उपस्थित करत लसिकरणाच्या विषयात गांभिर्याने लक्ष्य घालण्याची विनंती केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here