पारनेर : पारनेर अपडेट मिडिया
न्यू आर्ट्स कॉमर्स ॲण्ड सायन्स कॉलेज, पारनेर येथील रसायनशास्त्र विभागातील सात विद्यार्थ्यांची आंतरराष्ट्रीय औषधनिर्मिती कंपन्यांमध्ये निवड झाल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रंगनाथ आहेर यांनी दिली.
चालू शैक्षणिक वर्षात महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना विविध कंपनीच्या कॅम्पस इंटरव्ह्यूच्या माध्यमातून नोकरीच्या संधी प्राप्त करून दिल्या. विद्यार्थ्यांना बुद्धिमत्ता चाचणी, तांत्रिक मुलाखत व शेवटी वैयक्तिक मुलाखत या तीन स्तरीय प्रक्रियेतून जावे लागले. कु.लोंढे किरण, कु.महामुनी सुरज, कु. ठुबे ऋषिकेश यांची व्हीमता लॅब ली. हैदराबाद, कु.शिर्के चैताली, कु. बोरुडे अक्षय,कु. नवले देवदत्तयांची आरजेन लाईफ सायन्सेस प्रा. ली. हैदराबाद व कु. तिकोणे कोमल हिची क्लीनकेम लाब्रोटरीज एल. एल. पी. नवी मुंबई या ठिकाणी निवड झाली. विभागामार्फत विद्यार्थ्यांना मुलाखती साठी केलेले मार्गदर्शन उपयोगात आल्याचे मत विद्यार्थ्यांनी व्यक्त केले. महाविद्यालयात ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागातर्फे सातत्याने विविध कंपन्यांच्या कॅम्पस इंटरव्ह्यूचे आयोजन केले जात असून कठीण काळातही विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध करून देण्याचा आटोकाट प्रयत्न महाविद्यालय करीत आहे असे प्राचार्य डॉ. रंगनाथ आहेर यांनी संगितले. तसेच या महिन्याच्या अखेरीस महाविद्यालयामध्ये ऑनलाइन कॅम्पस इंटरव्ह्यूचे आयोजन केले जाणार असल्याची माहिती उपप्राचार्य व विभाग प्रमुख डॉ. दिलीप ठुबे यांनी दिली. या सर्व निवड झालेल्या यशस्वी विद्यार्थ्यांचे अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष माजी आ.नंदकुमार झावरे पाटील, उपाध्यक्ष रामचंद्र दरे, सचिव जी.डी.खानदेशे, सहसचिव विश्वासराव आठरे पाटील, खजिनदार डॉ. विवेक भापकर, ज्येष्ठ विश्वस्त सिताराम खिलारी, पारनेर पंचायत समितीचे माजी सभापती व विद्यमान सदस्य राहुल झावरे पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रंगनाथ आहेर, उपप्राचार्य डॉ. दिलीप ठुबे यांनी महाविद्यालयातील प्राध्यापकांचे कौतुक केले व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
गुणवत्ता आणि आत्मविश्वासाचे फलित !
ग्रामीण भागातील विद्यार्थी होतकरू,कष्टाळू आणि परिस्थितीची जाणीव असणारे असतात. या विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता,आत्मविश्वास असल्यामुळेच त्यांना नवनवीन संधी सहज पद्धतीने प्राप्त करता येतात. पारनेर महाविद्यालय हे नेहमीच विद्यार्थ्यांसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम सातत्याने राबवत असते. या उपक्रमांमुळे आज पारनेर महाविद्यालयाचे विद्यार्थी हे आंतरराष्ट्रीय स्तरावर पारनेर तालुक्याचे नाव अभिमानाने उंचावत आहे.
मा. आ. नंदकुमार झावरे पाटील
अध्यक्ष, अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज, अहमदनगर.