आ. लंके राष्ट्रवादीचा सामाजिक चेहरा-पद्मश्री पवार

पारनेर : पारनेर अपडेट मिडिया

प्रत्येक राजकीय पक्षाला एक सामाजिक चेहरा हवा असतो.माजी उपमुख्यमंत्री आर.आर.पाटील यांच्या नंतर आमदार नीलेश लंके यांच्या रुपाने राष्ट्रवादी काँग्रेसला सामाजिक चेहरा मिळाला असल्याचे प्रतिपादन आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार यांनी केले.

आमदार नीलेश लंके प्रतिष्ठानच्या पारनेर येथील मुख्य कार्यालयाचे उदघाटन पवार यांच्या हस्ते झाले.त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

आमदार नीलेश लंके, सोलापूर जिल्हा परिषदेचे सदस्य संतोष वारे, उद्योजक सुरेश धुरपते,आत्मा समितीचे अध्यक्ष राहुल झावरे, डॉ.बाळासाहेब कावरे, प्रभाकर कवाद,किसनराव रासकर, पंचायत समितीचे माजी सभापती सुदाम पवार, प्रतिष्ठानचे अध्यक्ष बापूसाहेब शिर्के,चंद्रकांत मोढवे, राजेंद्र चौधरी,दादा शिंदे,कारभारी पोटघन,अशोक घुले,विजय औटी, जितेश सरडे,अभय नांगरे,नगरसेवक मुदस्सिर सय्यद,संजय तरटे,शैलेश औटी,उमाताई बोरूडे,वैजयंता मते, दिपाली औटी आदी उपस्थित होते.

पद्मश्री पोपटराव पवार म्हणाले की,आमदार लंकेे आणि त्यांच्या सहकारी करीत असलेल्या समाजहिताच्या कामांमुळे पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघाची राज्यात एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे.त्यामुळे आमदार लंके यांच्याकडून मतदारसंघातील जनतेबरोबरच राज्यातील जनतेच्या अपेक्षा मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत.भविष्यात त्या मोठ्या प्रमाणावर वाढणार आहेत.जनतेच्या वाढलेल्या अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी नीलेश लंके प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांची आहे.कार्यकर्ते जनतेच्या अपेक्षा पूर्ण करतील व भविष्यात सामाजिक काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे आदर्श प्रतिष्ठान म्हणून नीलेश लंके प्रतिष्ठानची ओळख निर्माण होईल असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.

आमदार लंकेे म्हणाले की,ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, पोपटराव पवार यांच्या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करीत असल्याने मी भाग्यवान आहे.मतदारसंघातील विकास कामांना निधी आणण्यासाठी हजारे आणि पवार यांच्या शिफारशींचा मोठा फायदा होतो.त्यामुळे मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर कामे करणे शक्य होत असल्याचे आमदार लंके म्हणाले.प्रतिष्ठानचे कार्यकर्ते निस्वार्थपणे काम करतात.कार्यकर्त्यांनी समाजहिताची कामे करताना टिकाकारांकडे दुर्लक्ष करावे असा सल्ला आमदार लंके यांनी दिला.

उद्योजक सुरेश धुरपते,संतोष वारे,राजेंद्र चौधरी,जितेश सरडे यांची भाषणे झाली.वकील राहुल झावरे व चंद्रकांत मोढवे यांनी सूत्रसंचालन केले.

विरोधक नव्हे समिक्षक

हिवरेबाजारमध्ये तीस वर्षांत प्रथमच ग्रामपंचायतीची निवडणूक झाली.त्यावेळी पोपटरावांचे काम चांगले आहे पण त्यांच्या आजुबाजुचे कार्यकर्ते बरोबर नाहीत अशी चर्चा विरोधक करायचे.रोख मात्र माझ्यावरच असायचा.त्यामुळे प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी आमदार लंके यांच्याकडे कोणी बोट दाखवू नये यासाठी जबाबरीने वागावे.टिकाकारांकडे विरोधक म्हणून नव्हे तर आपल्या कामाचे समिक्षक म्हणून पहावे.

पद्मश्री पोपटराव पवार,कार्याध्यक्ष आदर्श गाव योजना.

Don`t copy text!
satta king gali